इच्छुक उमेदवारांची चुळबूळ

इच्छुक उमेदवारांची चुळबूळ

Published on

इच्छुक उमेदवारांची चुळबुळ
महायुती, आघाडीचे ठरत नसल्याने संभ्रमावस्था
वाशी, ता. १९ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. प्रभागरचना, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे, मात्र महायुती, महाविकास आघाडीची स्पष्ट भूमिका नसल्याने इच्छुक प्रचंड अस्वस्थ आहेत. महायुतीतील शिंदे गट, भाजप तसेच महाविकास आघाडीतील ठाकरे तसेच मनसे समर्थकांनी सोयीप्रमाणे काही प्रभागांत पॅनल तयार करण्यास सुरुवात केली असली तरी अंतिम आघाडी, महायुतीचा निर्णय अद्यापही धूसरच आहे. महायुती झाली, तर उमेदवारीच्या अंतिम समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील शिंदे सेना तसेच भाजपचे नाराज इच्छुक उमेदवारी मिळाली नाही, तर कोलांट्या मारण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुती असे पर्याय इच्छुकांनी डोळ्यासमोर ठेवले आहेत. जर महायुती झाली खरी लढत शिंदे, भाजपच्या उमदेवारांमध्येच होणार आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीचे ठरत नसल्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा स्वत:ची ताकद दाखवण्याकडे अनेकांचा कल आहे.
-----------------------------------
समाजमाध्यमांवर प्रचार
समाजमाध्यमांवर निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगत पक्षापेक्षा जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा, असा संदेश देण्यास सुरुवात केली आहे, तर काही ठिकाणी महायुतीतील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षांतराची शक्यता वाढली असून, काही प्रभागांत संघर्ष चुरशीचा होण्याचे संकेत आहेत.
-------------------------------
अपक्ष लढण्याची तयारी
महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढल्याचे दिसते. महाविकास आघाडीत ठाकरे, मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, पण काँग्रेस, शरद पवार गटाशी संवाद सुरू ठेवल्याचे बोलले जाते. काही ठिकाणी तर संभाव्य उमेदवारांनी तिकीट मिळाले नाही, तर अपक्ष लढण्याची तयारी आहे, तर युतीत शिंदे सेना, भाजपमधील युतीच्या निर्णयानंतर उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः--------------------
भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका करत आहे. त्यामुळे महायुती होणे अशक्य आहे. आम्ही स्वबळांवर १११ प्रभागांत इच्छुक उमेदवारांची तयारी करत आहोत. महायुती झाल्यास वरिष्ठ पातळीवर तिकीट देण्याचा निर्णय घेतला जाईल.
- किशोर पाटकर, जिल्हाध्यक्ष, शिंदे गट
ः-----------------------------
भारतीय जनता पार्टीतील उमेदवारांमध्ये संभ्रम नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकांऱ्यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे पालिका निवडणुकीत करू नका, अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे.
ः- संजीव नाईक, भाजप नेते
-------------------------------
नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी होणार असून, मनसेचादेखील समावेश आहे. महायुतीमधील उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, पण महाविकास आघाडीमधील पक्षांबरोबर राहिलेल्या इच्छुकांनाच प्रथम प्राधन्य देण्यात येईल.
- प्रवीण म्हात्रे, जिल्हाअध्यक्ष, ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com