देशाच्या भरभराटीसाठी उद्योजक निर्माण होण्याची गरज – डॉ. रविंद्र प्रभुदेसाई

देशाच्या भरभराटीसाठी उद्योजक निर्माण होण्याची गरज – डॉ. रविंद्र प्रभुदेसाई

Published on

देशाच्या भरभराटीसाठी उद्योजक निर्माण होण्याची गरज ः डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
ठाणे, ता. १९ ः भारतातील वाढती तरुणांची संख्या आणि त्यानुसार वाढणाऱ्या विविध गरजा लक्षात घेता, त्या पूर्ण करण्यासाठी उद्योजक निर्माण होणे ही काळाची गरज आहे आणि ही जबाबदारी भारतातील तरुणांनी स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.
विवेक आयोजित जनरेशन नेक्स्ट पुस्तक प्रकाशन कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांना हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांच्या हस्ते उद्योग-संस्कृती भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी चितळे बंधूचे संचालक इंद्रनील चितळे, केवा उद्योग समूहाचे अध्यक्ष केदार वझे, जनरेशन नेक्स्ट पुस्तकाच्या सहलेखक रमा ताम्हणकर आणि प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर, समन्वयक महेश वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. वझे आणि चितळे यांनीही या वेळी आपल्या उद्योगजकीय प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले.
प्रभुदेसाई पुढे म्हणाले, सरळ मार्गाने उद्योग केल्यास तरुणांना कोणतीच चिंता करण्याचे कारण नाही. स्व-कर्तृत्व आणि कौशल्याच्या बळावर १०० एकर जागा, १०० कोटी टर्नओव्हर आणि १०० वर्ष टिकणारा उद्योग असे ध्येय प्रत्येक तरुणाने बाळगले पाहिजे. अशा दृढ निश्चयाने कार्य केल्यास मराठी तरुणाई नक्कीच उद्योग जगतामध्ये नवा आदर्श निर्माण करेल, असेही ते म्हणाले.
जनरेशन नेक्स्ट पुस्तकात नव्या पिढीतील उद्योजकांच्या उद्योजकीय वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला असून, हे पुस्तक परदेशातील तरुण पिढी किती पुढे गेली आहे, या चर्चेला पूर्णविराम देऊन मराठी तरुणाईच्या उद्योग जगतातील प्रवासाला प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com