विज्ञान पर्यावरण, इतिहासाची प्रदर्शनातून तिहेरी सांगड
विज्ञान, पर्यावरण आणि इतिहासाची तिहेरी सांगड!
वसईच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अनोखा जनजागर
वसई, ता. १९ (बातमीदार) : आजच्या प्रगत विज्ञानाच्या युगात, ढासळते पर्यावरण आणि समृद्ध इतिहास यांची सांगड घालून वसई पश्चिम येथील थॉमस बॅप्टिस्टा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका भव्य प्रदर्शनातून यशस्वी जनजागर केला. कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदर्शनात विज्ञान, पर्यावरण आणि इतिहास या तीन विषयांचा त्रिवेणी संगम साधण्यात आला.
माहिती व तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवनिर्मितीवर आधारित विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. ढासळत्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृतीसोबतच ‘इको व्हिलेज’ ही संकल्पना मांडण्यात आली, ज्यात सौरऊर्जा, कचरा व्यवस्थापन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला गेला.
भूतकाळातील घटनांचा ताळेबंद मांडून इतिहासाचे महत्त्व सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, ‘बिन भिंतीचे वर्ग’ भरवून कृतियुक्त अध्ययनाचा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला नवी उभारी मिळाली असून, ते भविष्यातील जबाबदार नागरिक बनतील, असे मत पालक आणि नागरिकांनी व्यक्त केले. वसई आर्च बिशप थॉमस डिसोजा, थॉमस बॅप्टिस्टा शिक्षण संकुलाचे व्यवस्थापक रेव्ह. फादर डॉ. जॉन फरगोज, मुख्याध्यापक फादर किरण लोपीस, उपमुख्याध्यापिका एरिना डिकुन्हा, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
--------------
वसईच्या संस्कृतीचा ठेवा
वसईची आपली जुनी संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनाला आकर्षित करून घेण्यासाठी जुन्या पारंपरिक वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या, ज्यामध्ये जाते, पराडे, वाहनांची चाकं, विविध आभूषणे, वसईतील विविध पारंपारिक पेहराव प्रदर्शन हे उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले आहे. नव्याला जुन्याची जोड मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांनी आपली कला आणि इतिहास याबाबत माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

