वर्षभरात उद्यानाला अवकळा

वर्षभरात उद्यानाला अवकळा

Published on

वर्षभरात उद्यानाला अवकळा
कळंबोली सेक्टर चारमधील प्रकार, पालिकेचे दुर्लक्ष
पनवेल, ता. २० (बातमीदार) ः कळंबोली सेक्टर चारमधील भूखंड क्रमांक १९वर पनवेल महापालिकेने उद्यानावर कोट्यवधींचा खर्च केला आहे; मात्र वर्षभरातील उद्यानातील जॉगिंग ट्रॅक, ओपन ॲम्पी थिएटर, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, चिल्ड्रन पार्क, ओपन जिमची दुरवस्था झाली आहे.
उद्यानात बसवलेली खुली व्यायामशाळा पूर्णपणे निष्प्रभ झाली आहे. बसवलेले साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने तुटण्याच्या अवस्थेत आहे. व्यायामासाठीची उपकरणे नागरिकांच्या दुखापतीला निमित्त ठरत आहे. तसेच उद्यानातील स्वच्छतागृहावर लाखो रुपयांचा खर्च करूनही बंद अवस्थेत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे असल्याने हे प्रकार अपघातांना निमंत्रण देत आहेत.
-------------------------
सुरक्षेचा अभाव
जॉगिंग ट्रॅकवरील पेव्हर ब्लॉकचे काम निकृष्ट आहे. त्यामुळे सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या अपघाताची शक्यता आहे.
तसेच पालिकेतील नियुक्त केलेले सुरक्षा रक्षक उद्यानात दिसत नाहीत. त्यामुळे उद्यानात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
-------------------------
पनवेल महापालिकेने कोट्यवधींचा खर्च करूनही उद्यानाची अवस्था वर्षभरात बिकट झाली आहे. उद्यानाची नियमित देखभाल, सुरक्षा आणि सुविधांची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे.
- सायली सरक, अध्यक्ष, हिरकणी सामाजिक संस्था, कळंबोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com