वॉर्न आशिया परिषदेत डोंबिवलीकर डॉ. निलेश भणगे यांचा सहभाग
थायलंडमधील वॉर्न आशियात डोंबिवलीचा मान
डॉ. नीलेश भणगे यांचे हत्तीसंवर्धन संशोधन जागतिक तज्ज्ञांसमोर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली ः थायलंडमधील हुआ हिन येथे वाइल्ड लाइफ फ्रेंड्स फाउंडेशननेद्वारे आयोजित वॉर्न आशिया परिषदेसाठी २० देशांतील ५० हून अधिक संघटना एकत्र आल्या होत्या. यंदाच्या वर्षी १०० वन्यजीव रक्षक या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत भारत देशातर्फे डोंबिवलीकर रहिवासी आणि पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. नीलेश भणगे यांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत भणगे यांनी भारतातील हत्तींवर केलेल्या संशोधनासह त्यांची सुटका, उपचार, पुनर्वसन आणि कायदेशीर कार्यवाहीची माहिती उपस्थितांसमोर सादर केली.
वन्यजीवांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे, आशियातील अविश्वसनीय जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी समर्पित तज्ज्ञ आणि समर्थकांना एकत्र आणण्यासाठी थायलंडमधे वाइल्ड लाइफ फ्रेंड्स फाउंडेशनतर्फे वॉर्न आशिया परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत प्रेरणादायी भाषणे, संवादात्मक कार्यशाळा, आकर्षक सादरीकरणे आणि वन्यजीव संवर्धनाच्या आघाडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांशी जोडण्यासाठी, शिकण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी भरपूर संधी मिळाल्याचे डॉ. नीलेश भणगे यांनी सांगितले.
पॉज संस्थेने २००५ पासून महाराष्ट्र आणि गोव्यामधील पाळीव हत्ती यावर संशोधन करून दिल्लीच्या न्यायालयामध्ये अहवाल सादर केला. यासंदर्भात रिट पिटीशनही दाखल करण्यात आले आहे. तसेच संशोधकांचे पाच अहवालही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे रस्त्यावर भीक मागून फिरणारे हत्ती आता बंद झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

