कंटेनर अपघातामुळे वीजपुरवठा खंडित

कंटेनर अपघातामुळे वीजपुरवठा खंडित

Published on

कंटेनर अपघातामुळे वीजपुरवठा खंडित
साडेसहा तासांनंतर सुरळीत; कंटेनरची विद्युत पोलला धडक
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : उल्हासनगर परिसरातील काही भागांत बुधवारी (ता. १९) सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने शेकडो नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मंगळवारी मध्यरात्री आनंदनगर येथे कंटेनरने एका विद्युत पोलला जोरदार धडक दिल्यानंतर संपूर्ण लाइनच असुरक्षित झाल्याने महावितरणला अनेक महत्त्वाच्या फिडर्सवरील वीज तत्काळ बंद करावी लागली. तांत्रिक बिघाड, सुरक्षा जागरूकता आणि तातडीच्या दुरुस्तीचा समतोल साधत महावितरणच्या पथकाने युद्धपातळीवर काम केल्यावर बुधवारी दुपारी साडेचारनंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

अंबरनाथच्या आनंदनगर भागात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे उल्हासनगर उपविभाग ४ आणि ५ मधील अनेक फिडर्सवरील वीजपुरवठा बुधवारी सकाळी अकरापासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता. मध्यरात्री उशिरा एका कंटेनरचे अचानक नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की खांब वाकला आणि संपूर्ण वाहिनी असुरक्षित झाली.

सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका पत्करू नये, म्हणून महावितरणने पहाटेपासूनच प्रभावित क्षेत्रातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित केला. इनकमर जीपी-१ व जीपी-२अंतर्गत येणाऱ्या नेताजी, शोभराज, आशेळेपाडा-१, आशेळेपाडा-२, गेमनानी, ओटी व दूधनाका या सात महत्त्वाच्या फिडर्सवर सकाळी ११ वाजल्यापासून लोड बंद करण्यात आला होता.

युद्धपातळीवर काम
अपघातानंतर सर्वप्रथम लाइनवरील धोकादायक स्थिती दूर करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी पूर्णपणे वाकलेला खांब हटवून कंटेनर बाजूला करण्याची प्रक्रिया दुपारी दीडपर्यंत पूर्ण करण्यात आली; मात्र नवीन उच्च दाबाचा पोल उभारणे, वायरिंग समायोजन, लाइन टेस्टिंग अशा सर्व प्रक्रियेला तांत्रिक वेळ लागणार असल्याने वीजपुरवठा तत्काळ सुरू करणे शक्य नव्हते. अखेर महावितरणच्या तांत्रिक पथकांनी युद्धपातळीवर काम सुरू करीत दुपारी साडेचार वाजता वीजपुरवठा सुरळीत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com