टिटवाळ्याची कला दिल्ली ते जागतिक मंचावर दैदिप्यमान
टिटवाळ्याची कन्येची दिल्लीवर छाप
केंद्रस्तरीय निवड; अदिती दीक्षितच्या कलाकृतींना विशेष कौतुक
टिटवाळा, ता. २० (वार्ताहार) : टिटवाळ्यातील कलात्मक प्रतिभेला आता जागतिक स्तरावरही मान्यता मिळू लागली आहे. स्थानिक कलाकार अदिती दीक्षित हिच्या कलाकृतींचे इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये कौतुक करण्यात आले आहे. तिच्या यशामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टिटवाळा शहराची ओळख अधिक भक्कम होत आहे.
प्रगती मैदानावर प्रतिष्ठित आयआयटीएफ मेळा सुरू आहे. यामध्ये वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हँडीक्राफ्ट विभागाकडून टिटवाळ्यातील कलाकार अदिती दीक्षितच्या स्टुडिओ विरासत या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे. या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अदितीच्या स्टॉलला भेट देऊन तिच्या टीमच्या कामाचे मनापासून कौतुक केले. यामध्ये दिल्ली आयकर विभागाचे डेप्युटी कमिशनर डॉ. श्रीधर, हँडीक्राफ्ट विभागाच्या डेवलपमेंट कमिशनर अम्रीत राज आणि हँडलूम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. दिल्लीकरांनीही अदितीच्या हँडक्राफ्ट डिझाइन्सला भरभरून प्रतिसाद दिला.
दीक्षित कुटुंबाचा कलेचा तेजोमेघ
दीक्षित कुटुंबाने मागील काही महिन्यांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कलेचा तेजोमेघ पसरवला आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात स्पंदन ग्रुपतर्फे मुंबईतील हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित केलेल्या कला प्रदर्शनीत माधव दीक्षित यांच्या चित्रांची प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यांच्या काही पेंटिंग्जना विशेष दाद मिळाली असून, त्यापैकी एक युकेमधील कुटुंबाने खरेदी केले. त्यांच्या कलाकृतींसाठी नुकतेच ताजमहाल पॅलेस येथे स्पंदन ग्रुपने माधव दीक्षित यांना कला क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करत गौरव केला.
अदितीचा आंतरराष्ट्रीय गौरव
याच सोहळ्यात माधव दीक्षित यांची कन्या अदिती दीक्षित हिलाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील गौरव प्राप्त झाला. ग्रीस येथील एका प्रदर्शनात तिच्या सिरेमिक कलाकृतींचे विशेष कौतुक झाले. यानंतर तिच्या वस्तू इटली, स्पेन, फ्रान्स व स्वित्झर्लंड या देशांतील प्रदर्शनांसाठी निवडल्या गेल्या. या पार्श्वभूमीवर अदितीला कला क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कार प्रदान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

