महिंद्र अँड महिंद्रच्या कांदिवलीतील कामगारांना भरघोस वेतनवाढ
महिंद्र अँड महिंद्रच्या कामगारांना भरघोस वेतनवाढ
गेल्या तीन दशकांत पगारवाढीचा आठवा करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः कांदिवली येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीच्या पिककप वाहननिर्मिती करणाऱ्या कारखान्यातील कामगारांना १७,९०० रुपये एवढी भक्कम मासिक पगारवाढ मिळाली आहे. १,३०० कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. महिंद्र अँड महिंद्र वर्कर्स युनियचे सरचिटणीस आमदार सचिन अहिर यांनी ही पगारवाढ मिळवून दिली आहे. गेल्या तीन दशकांत पगारवाढीचा हा आठवा करार आहे.
या पगारवाढीचे कामगारांनी ढोल-ताशा वाजवत, गुलाल उधळून स्वागत केले. कांदिवली येथील ऑटोमोटिव्ह कंपनीत कामगारांच्या उपस्थितीत युनियनचे सरचिटणीस आमदार सचिन अहिर, अध्यक्ष रमेश ओटाली आदी पदाधिकाऱ्यांनी तसेच कंपनीचे चिफ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन विनय खानोलकर, व्हाईस प्रेसिडेंट ई-आर, संग्रामसिंग देशमुख व प्लांट हेड टॉम थॉमस आदींनी मॅनेजमेंटच्या वतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या वेळी सचिन अहिर म्हणाले, कारखाना टिकला तर कामगार जगेल आणि तसे झाले तर युनियनचीही उत्तरोत्तर प्रगती होत राहील, हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून कामगारांनी उत्पादनवाढीत योगदान दिले, म्हणूनच हा यशस्वी वेतनवाढीचा करार घडून आला. २०१४ला १,४०० कामगारांना कायम करून कंपनीचे संचालक दिवंगत केशुबजी महिंद्र यांनी मालक-कामगार संबंध किती दृढ आहेत, हे दाखवून दिले आहे. कराराप्रमाणे पगारवाढीचा पहिला टप्पा ९४ टक्के, दुसरा टप्पा ९७ टक्के आणि अंतिम तिसरा टप्पा १०० टक्के असणार आहे. कराराची मुदत साडेतीन वर्षे आहे.
...
एवढ्या मोठ्या पगारवाढीसाठी युनियनला ना कधी व्यवस्थापनाशी संघर्ष करावा लागला अथवा ना कधी झगडा करावा लागला आहे. परस्पर सामंजस्याने हा करार घडून आला आहे, म्हणूनच तो आदर्शवत ठरला आहे.
- सचिन अहिर, आमदार, शिवसेना (उबाठा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

