अंधारावर मात
अंधारावर मात
उरण पूर्वेला १० दिवसांत अखंडित वीजपुरवठा
उरण, ता. २० (वार्ताहर)ः तालुक्याचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. त्यामुळे कोस्टल रोडवरून वीजवाहिन्या जोडणीचे काम महावितरणने सुरू केले होते. १० दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याने पूर्व विभागाची वीज समस्येतून कायमची सुटका होणार आहे.
उरणच्या पूर्व भागात खोपटा पुलावरून जाणारी वीजवाहिनी भेंडखळ खाडीतून टाकण्यात आली होती. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता वीजवाहिन्या जिटीपीएस उपकेंद्रावरून करंजा कोस्टल रोडवरून बाह्यवळण मार्गावरून येत असल्यामुळे पूर्व भागातील वीज खंडित होण्याचे प्रमाण घटणार आहे. वीजवाहिन्यांची दुरुस्ती लवकर होणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील कोप्रोली, खोपटा, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे कडापे, भंगारपाडा, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठीजुई, कळंबूसरे, चिरनेर, मोठे भोम गावातील विजेची समस्या सुटणार आहे.
-------------------------
दुरुस्तीच्या कामात धोका
- उरण पूर्व भागाला जीटीपीएस उपकेंद्रावरून वीजपुरवठा सुरू आहे. याकरिता जीटीपीएस, भेंडखळ, नवघरवरून खोपटा पुलावरून वीजपुरवठा केला जातो, मात्र या वाहिन्या भेंडखळ खाडीतून टाकल्या असल्याने खारे वातावरण तसेच जोरदार वाऱ्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.
- खाडी भागातील दलदलीचा परिसर तसेच पाणी असल्यामुळे दुरुस्ती करताना महावीतरणच्या कामगारांना विविध अडचणी येत होत्या. कधी-कधी छातीभर पाण्यातून किंवा होडीतून कर्मचाऱ्यांना खाडीत उतरून काम करावे लागते. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात धोका तसेच खर्चिक होत होते.
----------------------------
कोस्टल रोड मार्गे वीजवाहिनी
उरणच्या पूर्व भागासाठी नवीन वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. जीटीपीएसवरून द्रोणागिरी नोडवरून कोस्टल रोड मार्गे खोपटा पुलावरून वीजपुरवठा करण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या वाहिनींमुळे रानसई एमआयडीसी, जेएनपीटी आणि जासई फिडरवरील विजेचा दाब कमी होणार आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबणार आहेत.
---------------------------
वीजवाहिनी जोडणीच्या कामात मधल्या काही वेळेत अडचणी आल्या होत्या. त्यामुळे विलंब झाला, मात्र वीजजोडणीचे काम पूर्ण झाले आहे. काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम बाकी असून, १० दिवसांत वीजपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- विकास गायकवाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण
---------------------------
पूर्व भागातील नागरिकांच्या मदतीने वीजवाहिन्या टाकण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. लवकरत काम पूर्ण होत आहे. अधिकाऱ्यांसोबत त्याची पाहणी केली होती. काही दिवसांतच नवीन वीजवाहिनीवरून वीजपुरवठा सुरू होणार आहे.
- गोरख ठाकूर, सामाजिक कार्यकर्ता, खोपटा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

