गैरसमजुतीमुळे कुष्ठरोगाचा प्रसार

गैरसमजुतीमुळे कुष्ठरोगाचा प्रसार

Published on

गैरसमजुतीतून कुष्ठरोगाचा प्रसार
आठ वर्षांत नऊ हजार नवीन रुग्ण; ग्रामीण भागात सर्वाधिक
ठाणे, ता. २० ः गैरसमजुती, अंधश्रद्धा आणि भीतीच्या विळख्यात आजही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कुष्ठरोगग्रस्त रुग्ण उपचारांसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी कुष्ठरोग निर्मूलन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असताना मागील आठ वर्षांत ग्रामीण भागातून तब्बल ९,०९६ रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत राबवण्यात आलेल्या कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत १,७५२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत असूनही, कुष्ठरोगासारख्या आजारांची नावे निघताच आजही भुवया उंचावल्या जातात. सातत्याने जनप्रबोधन करूनही नव्या रुग्णांची होणारी नोंद चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आरोग्य विभागाकडून नियमितपणे कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाते. यात भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यात नवीन रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. रोगाबद्दल असलेले गैरसमज, जुन्या कुष्ठरोग्यांची अपुरी काळजी आणि त्यामुळे होणारा संसर्ग यामुळे ग्रामीण भागात कुष्ठरोग आजही आपले अस्तित्व दाखवत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागांवर अजूनही कुष्ठरोगाचा पगडा असल्याचे दिसून येते. या रोगाबाबत असलेले गैरसमज, भागातील जुन्या कुष्ठरोग्यांची अपुरी घेतली जाणारी काळजी, परिणामी होणारा संसर्ग अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुष्ठरोग अद्यापही आपले अस्तित्व दाखवत आहे. अशातच दुसरीकडे मागील आठ वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नऊ हजार ९६ रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे. यामध्ये राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत एक हजार ७५२ नवीन रुग्णांची नोंद केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

कुष्ठरोगाची लक्षणे
कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे.
अंगावर फिक्कट किंवा लालसर रंगाचा बधिर चट्टा असणे आणि हाता-पायांमध्ये अशक्तपणा येणे.
कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहरा लालसर, तेलकट व जाड होणे.
त्वचेशी संलग्न मज्जा जाड व दुखऱ्या होणे.
कुष्ठरोग सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.

कुष्ठरोगामुळे येणारी विकृती
१) तळहाताला किंवा तळपायाला बधिरता येते. संवेदना नसल्याने भाजल्यास किंवा टोचल्यास वर्षानुवर्षे न बरी होणारी जखम पडू शकते.
२) डोळ्यांना दिसण्यासारखी : हाता-पायांची बोटे वाकडी होणे, मनगट किंवा पाय लुळे पडणे, तळहाताला/तळपायाला जखमा पडणे, डोळ्यांच्या पापण्या पूर्णतः बंद न करता येणे.


कुष्ठरोगाबाबत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वय समितीच्या वतीने सर्व अतिजोखमीच्या भागात राहणाऱ्या समाज घटकातील कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी


वर्ष एकूण केसेस सर्वेक्षणात आढळून आलेले रुग्ण
२०१७-१८ ९६३ ३१४
२०१८-१९ ८३७ १५७
२०१९-२० १००८ २७६
२०२०-२१ ४५७ १९४ (कोविड-१९)
२०२१-२२ ८७९ १४२
२०२२-२३ १,१५७ २४२
२०२३-२४ १,०३८ ३०२
२०२४-२५ ९७८ १२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com