वैज्ञानिक संकल्पनांना चालना
वैज्ञानिक संकल्पनांना चालना
सायन्स पार्कचा पहिला टप्पा जानेवारीत पूर्ण होणार
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः मुंबईतील नेहरू तारांगणच्या धर्तीवर नवी मुंबई पालिकेने नेरूळच्या वंडर्स पार्कमध्ये सायन्स पार्क साकारत आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याचे जानेवारी २०२६ पूर्तता होणार आहे. त्यामुळे विज्ञानाच्या नवनवीन संकल्पनांना चालना मिळणार आहे.
नवी मुंबई शहरात उद्याने, मैदाने सोडली तर पालिकेतर्फे विद्यार्थ्यांकरिता विरंगुळा अथवा पर्यटनस्थळ नाही. अशा परिस्थितीत आबालवृद्धांच्या ज्ञानात भर घालणारे अत्याधुनिक असे सायन्स पार्क उभारण्यात येत आहे. भौगोलिक आश्चर्यासहित रोबोटिक्स, एआयच्या धर्तीवर नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध केली जाणार आहे. पाच वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे आला आहे. सायन्स पार्कच्या डोमचे बांधकाम, रचना तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण करण्यास पालिकेला यश आले आहे. उर्वरित १० टक्के काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून जानेवारी २०२५ पासून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. या टप्प्यात डोमच्या सजावट, सुशोभीकरण, विविध प्रदर्शनी बसवणे, विविध कलादालनाचे सुशोभीकरण, प्रदर्शनी बसवणे, आसनव्यवस्था, विद्युतविषयक उपकरणे बसविणे अशी कामे होणार आहेत.
-------------------------------------------
रचना
खर्च - १५० कोटी
एकूण क्षेत्रफळ - २० हजार चौरस मीटर
----------------------------------------------
महत्त्वाचे टप्पे
जीवन विज्ञान प्रदर्शनी - ५९
ऊर्जा विज्ञान प्रदर्शनी - ४०
पर्यावरण विज्ञान प्रदर्शनी - ६५
यंत्र व हालचाली प्रदर्शनी - ४२
अंतशक्ती प्रदर्शनी - ४९
बाह्य प्रदर्शने कलाकृती - २३
सायन्स पार्कच्या आत २७८ प्रदर्शनी बसवण्यात येणार आहेत.
--------------------------------------------
जर्मन बनावटीचे छत
सायन्स पार्कच्या इमारतीवर अर्धगोलाकार छत बसवण्यात येणार आहे. अर्धे लोखंड आणि इतर टिकाऊ धातूंपासून तयार केलेल्या या छताचा आकार १० हजार १२५ चौरस मीटर आहे. या छताला आतून काचेचे आवरण असणार आहे. पावसाचा प्रतिध्वनी येणार नाही, याची काळजी घेतली आहे.
--------------------------------------------
प्रकल्पाची वाटचाल
२०१९ : संकल्पना सादर
२०२१ : सिडकोमार्फत जमीन हस्तांतरण
२०२२ ः बांधकाम टप्पा सुरू
२०२४ : ९०% संरचनात्मक काम पूर्ण
२०२५ : प्रदर्शन इन्स्टॉलेशन, उद्घाटनाची तयारी
-----------------------------------------------------
प्रकल्पाचे फायदे
विज्ञान पर्यटनात वाढ
विद्यार्थ्यांच्या प्रयोगात्मक शिक्षणाला चालना
नेरूळ-सीवूड्स परिसरात नवीन ओळख
शैक्षणिक कार्यशाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

