खाडीचा किनाऱ्यावर मृतदेहांची सावली!

खाडीचा किनाऱ्यावर मृतदेहांची सावली!

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : ठाणे शहराला लाभलेली खाडी आता सौंदर्यापेक्षा चिंता वाढवणारी बनत आहे. २२ महिन्यांत वेगवेगळ्या खाडी किनाऱ्यांवर तब्बल २५ मृतदेह सापडल्याने येथे मृतदेहांची सावली वावरतेय, अशी भीती वर्तवली जात आहे. सापडणारे काही मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मिळत असतील तर त्यांची ओळख पटविण्यासाठी चेहरा रिक्रिएशन करून एआयची मदत घेता येऊ शकते का, याबाबत ठाणे शहर पोलिस विचाराधीन असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ठाणे शहराला एका बाजूने खाडी, तर दुसऱ्या बाजूचा काही भाग हा डोंगराने व्यापलेला आहे. त्यातच शहरातील गायमुख, कोलशेत, बाळकुम, साकेत, कोपरी, मुंब्रा, दिवा आणि कळवा या परिसराला खाडीकिनारा लाभला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही मृतदेहांची ओळख पटली असली तरी अनेक प्रकरणांमध्ये मृतदेह अनामिक राहतात. ओहोटीच्या वेळी पाण्याच्या प्रवाहासोबत हे मृतदेह किनाऱ्याला लागतात. काही वेळा मुंबई, नवी मुंबईकडील अपघातग्रस्त किंवा आत्महत्येच्या घटनांमधील मृतदेहही खाडीच्या प्रवाहात वाहून येतात. अशा प्रकारे ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे आणि वागळे इस्टेट या परिमंडळ परिसरात २२ महिन्यांत २५ मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये पुरुषांचे २०, चार स्त्रियांचे आणि एक नवजात बालिकेच्या मृतदेहाचा समावेश आहे.
सापडणाऱ्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून मिसिंग केसची मदत घेतली जाते. तरी ओळख पुढे आली नाहीतर, मृतदेहाचे डीएनए घेतले जाते. याशिवाय जास्त वेळ पाण्यात राहिल्याने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून येत. त्या मृतदेहांची ओळख पुढे आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर डोकेदुखी होऊन बसते. असे मृतदेह असल्यास ती ओळख पुढे येण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाते.

एआयची मदत
सध्या एआयचा वापर केला जात आहे. त्यानुसार चेहरा रिक्रिएशन करण्यासाठी मदत होते का? हे पाहावे लागणार आहे. एआयने चेहरा रिक्रिएशन होत असेल तर मृतदेहांची ओळखही पुढे येईल. त्या दृष्टीने, पुढील तपास करणेही पोलिसांना शक्य होईल असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

महत्त्वाच्या घटना
* २०२१ मध्ये मनसुर हिरने यांचा मृतदेह मुंब्रा खाडीकिनारी सापडला होता.
* सप्टेंबरमध्ये प्रेमप्रकरणात अडथळा ठरणारा पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच प्रियकर आणि त्याच्या दोन मित्राच्या मदतीने अपहरण केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने खारेगाव खाडीत फेकले; मात्र तो बचावल्याने हा प्रकार समोर आला होता.
* जानेवारीत साकेत पुलाच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलावरून पलीकडे जाताना तोल जाऊन खाडीमध्ये ८५ वर्षीय महिला पडल्या होत्या. त्या आजीबाईंना स्थानिक नागरिकांनी वाचवले होते. घटना घडली तेव्हा खाडीत पाणी नसल्याने त्यांना दुखापत झाली होती.


मृतदेहांमध्ये पुरुष अधिक
२०२४ या वर्षभरात १४ मृतदेहांमध्ये १२ पुरुषांचे आहेत. कळवा आणि माजिवडा या परिसरात प्रत्येकी सहा आणि मुंब्रा तसेच कोपरी प्रत्येकी एक मृतदेह वाहून आला होता. तीच परिस्थिती २०२५मध्ये आहे. आठ पुरुष तर दोन स्त्री आणि एक नवजात स्त्री अर्भक आढळून आले आहे. कळवा आणि मुंब्रा येथे प्रत्येकी चार, माजिवाडा दोन आणि दिवा खाडीकिनारी एक मृतदेह वाहून आल्याची नोंद आहे.

मृतदेहांचा तक्ता
एकूण पुरुष/ स्त्री/ नवजात
२०२४ १४ १२ / ०२/००
२०२५ ११ ०८/०२/०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com