विभागस्तरीय युवा महोत्सवात पालघरचा ठसा

विभागस्तरीय युवा महोत्सवात पालघरचा ठसा

Published on

पालघर, ता. २० (बातमीदार) : खेळासोबत प्रत्येकाच्या अंगी कला-गुण असणे खूप गरजेचे आहे. चित्रकला, कथालेखन, कविता लेखन, विज्ञान प्रदर्शन, लोकगीत, लोकनृत्य आणि वक्तृत्व यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो. आपण हा आनंद मिळवला पाहिजे. युवक-युवतींनी उद्याचा समृद्ध भारत घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, कविता लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये पालघरने ठसा उमटवला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व युवक सेवेच्या मुंबई विभागाचे उपसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच सफाळ्यातील राजगुरु ह. म. पंडित विद्यालय व टिमा यांच्या सहकार्याने विभागस्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बोईसर येथील तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सभागृहात करण्यात आले. या स्पर्धेत विविध कला, कौशल्य आणि नवोपक्रमाचे दर्शन या महोत्सवात घडले. महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा देताना डॉ. जाखड बोलत होत्या.

युवा महोत्सवात सांस्कृतिक विभागात समूह लोकनृत्य व समूह लोकगायन यांसारख्या पारंपरिक कलांना मुला-मुलींनी दिमाखदार सादरीकरणातून उजाळा दिला, तर नवोपक्रम विभागात विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सुंदर दर्शन घडविले. कौशल्य विकास विभागात कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि कविता लेखन अशा सर्जनशील स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची उत्तम छाप पाडली. समारोपाच्या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, प्राचार्या मधुमती कुलकर्णी, गिरीश इरनक, भक्ती आंब्रे, अमृत घाडगे, मयूर खोल्लम आणि सर्व परीक्षक उपस्थित होते.

कविता लेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक प्रिया राठोड (पालघर)

कथालेखन स्पर्धा
प्रथम क्रमांक ईशांत मेहरा (ठाणे)

वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक आशुतोष शुक्ला (पालघर)

चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक कशिश गणेश तिखे (रायगड)

विज्ञान व तंत्रज्ञान स्पर्धा
प्रथम क्रमांक बी एन बांदोडकर सीनियर कॉलेज (ठाणे)

लोकगीत स्पर्धा
प्रथम क्रमांक सी. के. टी. कॉलेज (पनवेल, जि. रायगड)

लोकनृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक सह्याद्री महाविद्यालय (जूचंद्र, वसई)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com