पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

Published on

नेरूळच्या प्रवेशद्वारावर अपघातांचा धोका
जुईनगर (बातमीदार) : नेरुळ रेल्वे स्थानकासमोर प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक अथवा रंबलर्स बसवण्याची मागणी होत आहे. तेरणा रुग्णालय ते गुडविल इमारतीपर्यंत वाहनांसह नागरिकांची ये-जा असते. विशेषतः सकाळी, संध्याकाळी गर्दी होते. तसेच बस, ट्रक अशा वाहनांची सातत्याने वाहतूक असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले असून या ठिकाणी गतिरोधक आणि रंबलर्स बसवण्याची मागणी होत आहे.
ः--------------------------------------
सायबर गुन्ह्याविरोधात जनजागृती शिबिर
नेरूळ (बातमीदार)ः सायबर चोरांकडून पालक, मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त, वयोवृद्ध, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. याबाबत ज्ञानदीप शाळेत एनआरआय पोलिस ठाणे यांच्यामार्फत पालकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यात येऊ नये. तसेच कंपन्यांबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सायबर गुन्हेबाबत एनआरआय पोलिस ठाणे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी पालकांना मार्गदर्शन केले. शिबिरात पालक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र नाईक, माध्यमिक मुख्याध्यापक रत्नाकर तांडेल, प्राथमिक मुख्याध्यापक बंकट तांडेल, पोलिस कर्मचारी हेमंत लेगडे उपस्थित होते.
---------------------------
व्यवसाय परवान्यांचे पालिकेकडून वाटप
पनवेल (बातमीदार)ः पालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात गुरूवारी (ता.२०) रोजी हिरानंदानी, खारघर परिसरात पनवेल महापालिका परवाना विभागामार्फत व्यवसाय परवाना शिबिर घेण्यात आले. पालिका क्षेत्रातील छोटे-मोठे व्यावसायिकांना परवाना मिळविण्यासाठी वारंवार पालिका कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. नागरिकांनी एकाच ठिकाणी अर्ज सादर करून, कमीत कमी आवश्यक कागदपत्रे प्रदान करीत त्याच दिवशी व्यवसाय परवाना मिळावा, यासाठी पनवेल पालिकेच्यावतीने उपायुक्त रवीकिरण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिर घेण्यात आले. यावेळी कागदपत्रांसह अर्ज केलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय परवाना देण्यात आला.
़़़़़़़ः-----------------------------------
हरवलेली बॅग मालकाला परत
पनवेल (बातमीदार)ः वसुधा जगे यांची बॅग खांदा कॉलनी येथे हरवले असता पनवेल वाहतूक शाखा कार्यालय येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना भेटून समक्ष सांगितले. औदुंबर पाटील यांनी तात्काळ त्यांचे वाहन चालक केशव निकम, महिला पोलिस कर्मचारी योगिता पाटील यांना माहिती देऊन बॅगचा शोध घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर योगिता पाटील यांनी मोबाइलच्या लोकेशनवरून नवीन पनवेलकडे जाणाऱ्या गुरुद्वाराजवळ स्कूलव्हॅन चालक यांना सापडले. त्यांच्याकडून बॅग पुन्हा मूळ मालकांना करण्यात आली.
ः--------------------------------
वीर वाजेकर महाविद्यालयात व्याख्यान
उरण (वार्ताहर)ः रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व जेएनपीए व्हिजिलन्स डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सतर्कता जागरूकता निमित्त हिमांशू वैष्णोई यांच्या व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जगताप यांनी केले. १७ ऑगस्ट ते २ नोव्हेंबर दरम्यान सतर्कता जागरूकता आठवडा साजरा केला जातो. ‘नीतिमत्ता आणि शासन’ याविषयावर व्याख्यान झाले. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यास भविष्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी फार उपयुक्त होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com