सकाळ क्रिकेट स्पर्धा

सकाळ क्रिकेट स्पर्धा

Published on

नवी मुंबईत आजपासून सकाळ चॅम्पियन्स कप
आठवडाभर रंगणार थरारक सामने

नवी मुंबई, ता. २३ : क्रिकेटमुळे देशभरात वातावरण भारलेले असताना ⁠‘सकाळ चॅम्पियन्स कप २०२५ ’⁠ या टेनिस क्रिकेट स्पर्धेचीही उत्सुकता मुंबई आणि परिसरात कमालीची वाढली आहे. लाखोंची बक्षिसे असलेली ही स्पर्धा नवी मुंबईत उद्यापासून सुरू होत आहे. त्यातून आठवडाभर चौकार-षटकारांची आणि धावांचीही आतषबाजी होणार आहे.
सीबीडी बेलापूर येथील रायगड भवनासमोरील सिडको क्रिकेट मैदानात ‘सकाळ चॅम्पियन्स करंडक २०२५’चा थरार रंगणार आहे. टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रात या स्पर्धेबाबतचे वातावरण अगोदरच तयार झालेले आहे. उद्या सकाळी पहिला चेंडू टाकला जाईल आणि त्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वत्र हाच विषय चर्चेत असेल. ‘सकाळ माध्यम समूहा’ने स्थानिक क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी हे मोठे व्यासपीठ तयार केले आहे. नवी मुंबई परिसरातील क्रीडा रसिकांनाही क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.
सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ४८ संघ सहभागी होणार असून, महामुंबईतील पाचही जिल्ह्यांसह बाहेरील परिसरातीलही काही संघ आहेत. प्रत्येक दिवशी आठ सामने होतील. तरुण उदयोन्मुख आणि नावाजलेल्या खेळाडूंसह ४० वर्षे आणि अधिक वय असलेले खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सर्व वयोगटांतील खेळाडूंसाठी आहे. यानिमित्ताने प्रत्येकाला आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांइतकाच थाट या स्पर्धेचा असणार आहे.
...
अंतिम सामना ३० नोव्हेंबरला
सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला अनुभवसंपन्न करणारी ही स्पर्धा असेलच; त्याचबरोबर प्रेक्षकांनाही सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. बसण्यासाठी खुर्च्या आहेत, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आच्छादन आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ३० नोव्हेंबरला होणार आहे.
...
थेट प्रक्षेपण
स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे पीटीसी क्रिकेट लाइव्ह या यूट्युब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील सर्वांना थेट प्रेक्षपण पाहता येणार आहे. हे सामने पाहताना आगळ्यावेगळ्या शैलीतील समालोचनाचीही फोडणी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com