पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

Published on

पदपथावरील वाहनांचे धडकेत नुकसान
जुईनगर (बातमीदार): वाशी सेक्टर ९ येथील पोलिस चौकीलगत दोन वाहनांना जोरदार धडक देण्यात आली. या अपघातात शेजारी असलेल्या आणखी एका वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. वाशीकडून कोपरखैरणेच्या दिशेने गेलेल्या वाहनानी ही धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.
वाशी सेक्टर ९ येथील पादचारी पुलानजीक असलेल्या एफ टाईप प्रकारच्या मुथूट फिनकॉर्प कंपनीचे कार्यालय समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. इमारतीतील प्रशांत खंडागळे तसेच हार विक्रेते सुधीर लोणारी यांच्या वाहनांचे अपघातात नुकसान झाले आहे. पादचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरखैरणेच्या दिशेने गेलेल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने ही धडक दिली होती.
़ः---------------------------------
अंधश्रद्धा निमुलनाचे खारघरमध्ये व्याख्यान
खारघर (बातमीदार): विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खारघर शाखेच्याने लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयात शनिवारी भारतीय संविधान दिन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन हा कार्यक्रम झाला. यावेळी शिवाजीनगर पुणे शाखेच्या महिला सेल प्रमुख ॲड. पारिक्रमा खोत यांनी संविधानातील मूल्ये, समता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत मार्गदर्शन केले. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पंडित यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन:संविधानाची दृष्टी, समाजाची प्रगती, या विषयावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
़़़़़़़ः------------------------------------
रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद
उलवे(बातमीदार): उलवे- गव्हाण परिसरात श्री अनिरुद्ध उपासना केंद्र आयोजित रक्तदान शिबिर झाले. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र गव्हाण कोपर आणि उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने कोपर तलाव परिसरात रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेल्या ८ वर्षांपासून सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र आणि अनिरुद्ध अकादमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या वतीने उलवे, गव्हाण, खारकोपर तसेच आसपासच्या परिसरांत रक्तदान शिबिर घेण्यात येते. यंदाच्या शिबिरात दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्ध समर्पण पथक, टाटा मेमोरियल ब्लड बँक (कॅन्सर) या संस्थांचा सक्रिय सहभाग होता. या शिबिरात १८३ लोकांनी रक्तदान केले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़-------------------------------
उद्योजक बनण्याची महिलांना संधी
खारघर (बातमीदार) : महिलांमधील कौशल्याला चालना देताना उद्योजक बनवण्यासाठी पनवेल महापालिका बालकल्याण विभाग आणि ओम ग्रामणे इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल एक्सलन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन डिझाईन प्रशिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. भाजप सरचिटणीस उत्तर विनोद घरत यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घघाटन पार पडले. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकू, माजी सभागृह परेश ठाकूर यांच्या प्रेरणा आणि महाराष्ट्र राज्य परिषद भाजप सदस्य अरुण भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी सचिन वास्कर, संतोष घरत, जगदीश घरत, महिला पदाधिकारी सारिका जाधव, नूतन डांगळे, मनीषा तळवलकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com