अखेर अलिबाग-वडखळ रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

अखेर अलिबाग-वडखळ रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

Published on

अलिबाग-वडखळ रस्‍त्‍याचे काम निकृष्ट
वाहनचालकांमध्ये संताप; नागरिकांना कोंडीचा त्रास
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अलिबाग-वडखळ रस्त्यावरील खड्डे पुन्हा एकदा तात्पुरते भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे खड्डे भरताना ठेकेदार अगदी निवडून खड्डे भरत असल्याची चर्चा आहे. हे खड्डे भरण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, किमान मोठे खड्डे बुजवल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.
अलिबाग-वडखळ महामार्गावर गेल्या वर्षभरापासून खड्डे पडले होते. या खड्ड्यातून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. या रस्त्यासाठी राजकीय, सामाजिक संस्थांनी आंदोलन केले होते. मात्र खड्डे भरण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत होता. पावसाचा कालावधी वाढल्यामुळे खड्डे भरण्यास अडचणी येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. अखेर पुन्हा एकदा या महामार्गावर खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे खड्डे भरण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने हे खड्डे भरण्याचे काम सुरू केल्याची चर्चादेखील रंगली आहे.
...............
सरसकट खड्डे न भरल्याने नाराजी
या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सध्या ठेकेदाराकडून हे मोठे खड्डेच बुजवले जात आहेत. यामुळे रस्ता उंच-सखल झाल्याने वाहनचालकांची विशेषतः दुचाकीचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यामुळे नवीन रस्ता होईपर्यंत सरसकट खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
..............

रहदारीच्या वेळी रस्त्याचे काम
अलिबाग-वडखळ रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली असली तरी हे काम दिवसभरात रहदारीच्या वेळी होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सध्या निवडणूक व हिवाळी पर्यटन हंगाम यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
..................

नवीन रस्ता कधी होणार?
या रस्त्याचे काम करण्यासाठी २२ कोटींचा ठेकाही दिला आहे. त्यामुळे नव्याने रस्त्याचे बांधकाम कधी सुरू होणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. खड्डे भरले तरी हा रस्ता पूर्णपणे नव्याने बांधणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com