कोळशेवाडी गणपती चौकात पाईपलाईन फुटली
कोळशेवाडी गणपती चौकात पाइपलाइन फुटली
कल्याण, ता.२४ (बातमीदार) : कोळसेवाडी गणपती चौकातून काटेमानिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची पाण्याची पाइपलाइन फुटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गळती झाली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाइपलाइन फुटल्याने रस्त्यावर पाणी पसरले असून वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी या गळतीप्रकरणी महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली असून, संबंधित विभागाकडून लवकर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिका अधिकारी लिकेज तातडीने दुरुस्त करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या तक्रारीवर महानगरपालिका नेमकी किती जलद कारवाई करते आणि नागरिकांना त्रासातून कितपत मुक्ती मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाण्याची होतेय चोरी?
दुसऱ्या घटनेत कोळसेवाडीतील उतेकर चौक परिसरात निर्माणाधिन रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून पाण्याची चोरी होत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. जलवाहिनीला प्लॅस्टिकचा पाईप लावून हे पाणी काढून घेतले जाते. या ठिकाणी जलवाहिनी गळती सुरू आहे की जाणूनबुजून अवैधरित्या छिद्र पाडले आहे, याचाही तपास पाणीपुरवठा विभागाने करणे गरजेचे बनले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

