तर पालिका मुख्यालयासमोर करणार  नग्न आंदोलन

तर पालिका मुख्यालयासमोर करणार नग्न आंदोलन

Published on

...अन्यथा पालिकेसमोर नग्न आंदोलन
टिटवाळ्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला विलंब ः नागरिकांचा संताप
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ‘अ’ प्रभागक्षेत्र हद्दीअंतर्गत येणाऱ्या टिटवाळा पूर्व येथील श्री विनायक आशिष अपार्टमेंटमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश असूनही, पालिका प्रशासनाकडून अद्याप कारवाई झालेली नाही. परिणामी, महापालिका प्रशासनाची ढिसाळ कार्यपद्धती आणि वार्ड कार्यालयाचा सुस्त कारभार यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेले पाच गाळे आणि दोन सदनिका हटवण्यासाठी पालिकेने नऊ महिन्यापुर्वीच आदेश दिले होते. मात्र आजतागायत कोणतीही प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. यामुळे रहिवाशांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप अपार्टमेंटमचे अध्यक्ष राहुल केळुसकर यांसह सोसायटी पदाधिकारी व सभासद यांनी केला आहे.

तत्काळ पाडकामाची तारीख जाहीर करावी
रेल्वे स्थानकाजवळील परिसर सतत गजबजलेला असतो. अशा ठिकाणी पार्किंगची जागा काढून गाळे व सदनिका उभारल्याने शहररचनेलाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ पाडकामाची तारीख जाहीर करावी आणि कारवाई करावी. यासोबतच चालढकल करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा पालिका मुख्यालयासमोर नग्न आंदोलन केले जाई,ल असा केळूसकर यांनी दिला.

पालिका प्रशासनाची प्रतिष्ठा पणाला
कल्याण-डोंबिवली महापालिका अनधिकृत बांधकाममुक्त शहराचे स्वप्न दाखवते, पण प्रत्यक्ष उदाहरणांमध्ये अशी ढिलाई प्रशासनाच्या विश्वासार्हतेलाच धक्का पोहोचवते. प्रभाग ‘अ’ कार्यालय आणि सहाय्यक आयुक्त यांनी याबाबत तातडीने वास्तवदर्शी निर्णय घेतला नाही तर हे प्रकरण पालिकेच्या कार्यक्षमतेसाठी मोठा कलंक ठरू शकते. याबाबत प्रभाग ‘अ’ कार्यालय आणि सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना विचारणा केली असता मी याबाबत वरीष्ठांशी चर्चा करून काय तो निर्णय घेईल, असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com