सातव्या वर्षी समुद्रावर अधिराज्य
सातव्या वर्षी समुद्रावर अधिराज्य
पनवेलच्या सारा वर्तककडून ३० किलोमीटरचे अंतर पार
पनवेल ता.२५ (बातमीदार)ः पनवेल येथील अवघ्या सात वर्षांची सारा वर्तकने मालपे जेट्टी ते विजयदुर्ग जेट्टी दरम्यानेच ३० किलोमीटरचा समुद्री मार्ग केवळ ७ तासांत पूर्ण केला आहे. खुल्या वयोगटामधील तिचे धाडस, जिद्द आणि दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत जलतरणाचे धडे गिरवणारी साराची पहिलीच समुद्री जलतरण स्पर्धा होती. समुद्रातील भरती-ओहोटी, वेगवान प्रवाह, बदलते हवामान आणि सलग अनेक तास पाण्यात पोहण्याचे प्रचंड आव्हान स्वीकारत तिने सहनशक्तीची जोरावर आव्हानावर मात केली. अत्यंत शिस्तबद्ध, निडर आणि मेहनती असलेल्या साराची जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे तिचे प्रशिक्षक किशोर पाटील, रुग्वेद पाटील, सूरज लोखंडे यांनी सांगितले. यावेळी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेले तिची आई वैष्णवी, अभिजीत वर्तक अत्यंत भावूक झाले. या यशामुळे रायगडमधील सर्वात लहान वयातील जलपटू म्हणून देखील तिला गौरवले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

