मतदारांच्या नावावर फुली

मतदारांच्या नावावर फुली

Published on

मतदारांच्या नावावर फुली
पनवेल पालिकेच्या यादीमुळे इच्छुकांची नाराजी
खारघर, ता. २५ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. काही मतदारांचा इपिक क्रमांक नमूद आहे; मात्र मतदारांचे नाव नमूद नसल्याने इच्छुक उमेदवारांची दमछाक होणार आहे.
पनवेल महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादी गुरुवारी (ता. २०) संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. पनवेल महापालिका क्षेत्रात ५,५४,५७८ मतदारांचा समावेश असून २,५९,६८५ महिला तर २,९४,८२१ पुरुष मतदार आहेत. विशेष म्हणजे, खारघर परिसरात काही मतदारांच्या नोंदीत गोंधळ असल्याची चर्चा आहे. खारघरमधील प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रभाग ३४ हजार ६००, प्रभाग क्रमांक पाचमध्ये ३२ हजार तर प्रभाग क्रमांक सहामध्ये ३७ हजार ५०० मतदार आहेत. प्रभाग क्रमांक चारमधील मतदार यादीत काही मतदाराचा ईपीक क्रमांक नमूद आहे; पण काहींची नावे तर काहींचे फोटो नसल्याने अशा मतदारांना शोधणार कुठे, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे.
------------------------------------
खारघरमधील मतदार यादीत सावळागोंधळ आहे. वास्तव्य करीत असलेल्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात आहेत. २०१० पासून हा प्रकार सुरू आहे. मतदार याद्या सुधारित करण्याऐवजी बिघाडी अधिक असल्याने उमेदवारांना मतदारांचा शोध घेताना नाकीनऊ येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अनेक वेळा आयोगाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे; मात्र अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे मनसेचे पदाधिकारी गणेश बनकर यांनी सांगितले.
---------------------------------
ज्या प्रभागातील मतदारांची नावे इतर प्रभागांत गेली आहे. तसेच मतदारांची नावे नाही. माहितीतील त्रुटींबाबत मतदारांनी गुरुवार (ता. २७)पर्यंत हरकती नोंदविणे आवश्यक आहे. हरकती प्राप्त झाल्यावर चौकशी करून त्यावर निर्णय घेतला जाईल.
- नानासाहेब कामठे, निवडणूक अधिकारी, पनवेल पालिका
-------------------------
खारघर सेक्टर १९ मधील दोनशेहून अधिक मतदारांची नावे प्रभाग क्रमांक सहामध्ये आहेत. तर काही मतदारांची नावे नसलेली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा मतदारांना शोधणार कुठे, असा प्रश्न पडला आहे. याविषयी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे.
- किरण पाटील, पदाधिकारी, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com