कोपरी पोलिस ठाण्याचा अनोखा उपक्रम;
कोपरी पोलिस ठाण्याचा अनोखा उपक्रम
मुलांच्या चेहऱ्यावर उमटला अभिमानाचा प्रकाश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : पोलिसांविषयी शाळकरी मुलांच्या मनातील गैरसमज दूर व्हावेत आणि पोलिसांची खरी कामगिरी त्यांना समजावी, या हेतूने कोपरी पोलिसांनी नानिक इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी पोलिस स्टेशन अनुभव दौरा मंगळवारी (ता. २५) आयोजित केला होता. या वेळी पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेली दिवस-रात्र धडपड अनेकांना माहिती असली तरी लहान मुलांना पोलिस कामकाजाविषयी अत्यल्प माहिती असते. त्यांच्या कल्पनेत पोलिस म्हणजे चोर-दरोडेखोर पकडणारे एवढीच मर्यादित ओळख असते. हा गैरसमज दूर करण्यासाठी कोपरी पोलिसांनी प्रत्यक्ष ठाण्यातील कामकाज मुलांना दाखवले.
वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षानिमित्ताने केंद्र सरकारने वर्षभर विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कोपरी पोलिस ठाण्याने समाजजागृतीचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षानिमित्त विद्यार्थ्यांकडून उत्साहात समूहगानही म्हणून घेण्यात आले आणि त्या सुरेल वातावरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीने भारला होता. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार, पोलिस निरीक्षक प्रदीप केरकर, पोलिस उपनिरीक्षक सीताराम गावित, रोहिणी नरसिंगे, जितेंद्र खलाटे, सुप्रिया खैरनार आदी उपस्थित होते.
जनजागृती
- कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदणी प्रक्रिया, तपास पद्धती, तक्रार निवारण, ठाण्याचे दैनंदिन काम, तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या पथकाचे कार्य, नागरिकांशी संवाद या सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आली.
- यानंतर मुलांना पोलिसांकडील अत्यावश्यक शस्त्रास्त्रांची ओळख करून देण्यात आली. एसएलआर रायफल, एके ४७, कार्बाईन, गॅसगन, हातकडी आणि दोर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कोणत्या परिस्थितीत कोणते शस्त्र वापरले जाते याचे स्पष्टीकरण मुलांना अतिशय रोचक वाटले.
- सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करताना ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचे सुरक्षित वापर नियम, नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहितेची प्राथमिक माहिती, अमली पदार्थविरोधी गुन्ह्यांचे परिणाम याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

