जलसेवेसाठी सिडकोची कसरत

जलसेवेसाठी सिडकोची कसरत

Published on

जलसेवेसाठी तारेवरची कसरत
नेरूळ ते भाऊचा धक्का मार्गासाठी पुन्हा निविदा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : नेरूळ ते भाऊचा धक्का, मांडवा जलमार्गाकरिता सिडकोने उभारलेल्या नेरूळ जेट्टी अनेक वर्षे धूळखात पडून आहे. या जेट्टीवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोला कंत्राटदार मिळत नसल्याने पुन्हा निविदा राबवण्याची वेळ आली आहे.
सिडको, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त भागीदारीतून मुंबईला जलसेवेने जोडण्यासाठी जलमार्ग सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता सिडकोने जेट्टीचे बांधकाम पूर्ण करून दिले आहे. बोट आणि चालवण्याचे कंत्राट देऊन मेरीटाइम बोर्डामार्फत सेवेचे परिचलन करणार होते. त्यानुसार सिडकोतर्फे तीन वर्षे बांधकाम सुरू होते. नेरूळ येथील एनआरआय कॉलनी पाठीमागील बाजूस सिडकोतर्फे ११५ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत जेट्टी उभारली आहे. ६५० मीटर लांबीचा जोडरस्ता, पाच हजार चौरस मीटरची प्रशासकीय इमारत पूर्ण करण्यात आली आहे. परंतु नेरूळ ते भाऊचा धक्का अशी जलसेवा सुरू करण्यासाठी मेरीटाइम बोर्डाला कंत्राटदार मिळत नसल्याने सिडकोने दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवली.
---------------------------------
प्रवाशांची निराशा
नवी मुंबईतून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे, रस्ते वाहतूक असे दोन पर्याय आहेत. पण वाढती लोकसंख्या, शहरीकरणामुळे वाहतुकीवर ताण वाढला आहे. सायन-पनवेल महामार्गावरून मुंबईला जाण्यासाठी दोन तासांपेक्षा अधिकचा अवधी लागतो. तर रेल्वेच्या गर्दीत जीव नकोसा होतो. त्यामुळे स्वस्त, जलदगती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलवाहतुकीच्या सुविधेसाठी सिडको प्रयत्नशील आहे. पण त्याच्या अंमलबजावणीत अपयश आले आहे.
---------------------------------
प्रवासी वाहतूक तोट्यात
मेरीटाइम बोर्डाने बेलापूर रेती बंदर येथून भाऊचा धक्का, घारापुरी बेट, मांडवा आणि जेएनपीटी मार्गावर बोटसेवा सुरू केली आहे. यापैकी घारापुरी बोटसेवेचा पर्यटनाकरिता चांगला फायदा होत आहे. उर्वरित मार्गांवर प्रवासी वाहतुकीला प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे बोटसेवा देणारी कंत्राटदार कंपनीही तोट्यात असल्याचे समजते. त्यामुळे नवी मुंबईतील सिडकोच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com