महात्मा गांधी रोजगार योजना ठरतेय आधारवड

महात्मा गांधी रोजगार योजना ठरतेय आधारवड

Published on

महात्मा गांधी रोजगार योजना ठरतेय आधारवड
घराकुलांसह विविध कामांमुळे मनुष्यबळ निर्मितीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ग्रामीण भागात पावसाळ्यासह नोव्हेंबर ते डिसेंबर व जानेवारीपर्यंत मजुरांच्या हाताला काम मिळते. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळणे दुरपास्त होते. त्यामुळे कुटुंबीयांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न मजुरांसमोर उभा राहतो. अशा स्थितीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुलांच्या कामांसह विविध वैयक्तिक लाभाच्या योजना कामांसाठी मजूर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना रोजगार उपलब्ध होत असून, मनुष्यबळ निर्मितीतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मजुरांसाठी महात्मा गांधी योजना आधारवड ठरली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही रोजगारासाठी नागरिकांचे वीटभट्टीवर स्थलांतर होत असते. हे स्थलांतर थांबावे, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सद्य:स्थितीत जिल्ह्यात दोन हजार ६०३ कामे सुरू आहेत. यामध्ये सिंचन विहिरी, गायगोठे, कुक्कुटपालन शेड, बांधावर फळबाग लागवड, जुनी भात खाचरे दुरुस्ती, शोषखड्डे, वैयक्तिक शौचालये, शेततळे, दगडी बांध, बांधावर वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुती लागवड यासह प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे अकुशल काम, फळबाग लागवड, पडीक जमिनीवर वृक्षलागवड, रस्ता दुतर्फा, किनारपट्टीलगत, बांधावर, सिंचन विहिरी, शेततळे, शोषखड्डे, कंपोस्ट खत, गांडूळ खत टाकी, अझोला खत, जैविक खतनिर्मित साचा, गुरांचा, शेळीचा गोठा, कुक्कुटपालन शेड, बांधबंदिस्ती, रेशीम लागवड अशा कामांचा समावेश आहे.

मनुष्यबळ निर्मितीत मोठी वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मनुष्यबळ निर्मितीत मोठी वाढ झाली असल्याची माहिती महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने देण्यात आली. मागील वर्षी मनुष्यबळ निर्मिती सहा लाख ६१ हजार ४४७ होती. यंदाच्या वर्षी २०२५-२६साठी पाच लाख ३२ हजार ६५५ मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्टे देण्यात आले होते. नोव्हेंबर २०२५ पर्यंत ते १० लाख १४ हजार ९२ पर्यंत गेले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

घरकुलांच्या कामांमुळे मजुरांच्या हाताला काम
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास, मुख्यमंत्री आवास यासह रमाई आवास योजना अशा माध्यमातून घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. त्यामुळे मनुष्यबळ निर्मितीत वाढ होऊन मजुरांच्या हाताला काम मिळत आहे.


ठाणे जिल्ह्यातील कामांचा तक्ता (कुठे किती कामे व मजूर)
तालुका मंजूर कामे मजूर

अंबरनाथ २२८ ४३२

भिवंडी १,१०० २,६४०

कल्याण १६९ ४२१

मुरबाड ४१५ १,३०४

शहापूर ६९१ २,२५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com