कर्मवीरमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

कर्मवीरमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

Published on

कर्मवीरमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
विरार, ता. १ (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि एस. पी. ज्युनियर कॉलेज, जूचंद्र येथे २०२५-२६ चा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष विवेकानंद पाटील, विनय गोपीकिसन पाटील, ॲड. देवश्री म्हात्रे आणि तरुण क्रिकेटपटू उन्नती संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्याध्यापक विलास जगताप यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक म्हात्रे एस. व्ही. यांनी खेळाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ॲड. देवश्री म्हात्रे यांनी खेळाचे महत्त्व व उद्देश यावर मार्गदर्शन केले. प्रज्ञा भोईर यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून क्रीडा प्रतिज्ञेचे वाचन केले.
तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. वैयक्तिक आणि सांघिक अशा विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विजयी संघांचे अभिनंदन करण्यात आले. क्रीडा प्रमुख वसावे ए. ए. (आभार प्रदर्शन), स्मिता पाटील (नियोजन), उपमुख्याध्यापक नाडेकर आर. बी., पर्यवेक्षिका कविता पाटील आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

Marathi News Esakal
www.esakal.com