ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक

ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक

Published on

ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक
लग्न सोहळ्यातील मिरवणुकांमध्ये नियम पायदळी
पनवेल, ता. १ (बातमीदार): पनवेल, नवी मुंबईत सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या सोहळ्यांमध्ये बॅण्ड, डीजेचा आवाज वाढल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे लग्नसराईतील होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.
लग्नातील वरातीत कर्णकर्कश डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणे जीवावर बेतू शकते. कारण १०० पेक्षा अधिक डेसिबल आवाज कानावर सतत आदळल्याने हृदयाला जोडलेली रक्तवाहिनी उत्तेजित होते. अचानक रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची जोखीम असते. अनेकदा बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे आवाजाची मर्यादा पाळावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. शिवाय बेभानपणे होणारा जल्लोष कानठळ्या बसवणारा असतो. त्या आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रियांना अधिक त्रास असल्याचे प्रसूतिरोगतज्ज्ञ डॉ. ऋजुता फुके यांनी सांगितले.
-----------------------------
आवाजाचे धोके
- ८० ते १०० डेसिबल मर्यादेचा आवाज सतत कानावर पडत राहिल्यास कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. १०० ते १२० डेसिबल दरम्यानच्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटू शकतो, चक्कर येऊ शकते. या आवाजामुळे हृदयाला जोडलेली नस उत्तेजित होते.
- हार्मोनच्या पातळीत बदल होतो. जितका जास्त काळ कानावर आवाज पडेल तितका धोका वाढत जातो. कानात सतत शिटी वाजल्यासारखे, मधमाश्या गुणगुणल्यासारखा आवाज येतो. याला ‘टीनीटस’ असे म्हणतात. ही परिस्थिती तात्पुरती किंवा कायमस्वरूपीही असू शकते.
-------------------------
डीजेच्या दणद‌णाटामुळे शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. प्रत्येकाची एक आवड-निवड असते. आवाजाने चिडचिड वाढून त्याचा झोपेवरही परिणाम होतो.
- डॉ. सिद्धेश परहार, मानसोपचारतज्ज्ञ, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com