मतदानासाठी पालघरवासीय सज्ज

मतदानासाठी पालघरवासीय सज्ज

Published on

पालघर, ता. १ (बातमीदार) : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांसह एका नगर पंचायतीच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी उद्या (ता. २) मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण एक लाख १६ हजार ६६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील एकूण १२५ केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांवर मतदान पथक आज (ता. १) रवाना झाली आहे.

भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये युती न झाल्यामुळे या दोन्हीही पक्षांनी प्रचारासाठी आपले शक्तिप्रदर्शन मोठ्या प्रमाणात केले आहे. प्रचारासाठी एकंदरीत मतदार कमी, पण परिसरातील इतर गावातील किंवा शहरातील प्रचारासाठी खास निमंत्रित करून जनशक्तीचे प्रदर्शन करून दाखविले. आजपर्यंत प्रचाराची रणधुमाळी सुरूच आहे. एकंदरीत किरकोळ प्रकार वगळता कुठेही मोठ्या प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. एकंदरीत शांततेत प्रचार सुरू होता. मतदान शंभर टक्के व्हावे, यासाठी प्रशासनानेही मोठी आघाडी घेतली होती, मात्र किती यश येते, हे मतदानानंतरच समजणार आहे.

बुधवारी मतमोजणी
न्यायालयाच्या आदेशानुसार, पालघर नगर परिषद प्रभाग १ ब आणि वाडा नगर पंचायत प्रभाग १२ येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तथापि नगराध्यक्षपदाची निवडणूक, तसेच इतर सर्व प्रभागांतील सदस्यपदांची निवडणूक पूर्वानुसार होणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर मतमोजणी बुधवारी (ता. ३) होणार आहे.

संस्था मतदार
पालघर नगर परिषद ५५,७२७
डहाणू नगर परिषद ३८,६९३
जव्हार नगर परिषद ९,३४७
वाडा नगर पंचायत १२,८९३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com