प्लॅस्टिक बंदीची एैसीतैशी
बेकायदा फेरीवाल्यांना अभय
पनवेल पालिकेची आठवडा बाजारांना परवानगी
पनवेल, ता. २ (बातमीदार)ः पनवेल पालिका प्रशासनाने सिडको वसाहतींमध्ये भरणाऱ्या आठवडा बाजारांना परवानगी दिली आहे. या बाजारांमध्ये मुंबईतील विक्रेते प्रतिबंधित प्लॅस्टिकची सर्रासपणे विक्री होत आहे. शिवाय मुंबई तसेच उपनगरांतील बेकायदा फेरीवाल्यांना प्रोत्साहन मिळत आहे.
पनवेल महापालिका परिसरातील सर्व वसाहतीत सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर आठवडा बाजार भरवला जात आहे. यासाठी महापालिकेने काही बाजारांना परवानगी दिली आहे. प्रत्येक महिन्यातील ठरवून दिलेल्या वाराला बाजार भरवण्यासाची ४५४ परवाना शुल्क तसेच सात हजार ०५० रुपयांचे घनकचरा व्यवस्थापनासाठीचे माफक शुल्क आकारले जाते. उल्हासनगर, कल्याण, गोवंडी, मानखुर्द, मुंबई येथून विक्रेते येथे येतात. कपडे, घरगुती वस्तू, भाजीपाला, खेळणी, चप्पल, शोभेच्या वस्तू, कटलरी अशा सर्वप्रकारच्या वस्तू विकल्या जातात, पण या बाजारांमुळे विविध समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे महापालिकेचा आठवडा बाजारांना परवानगी देण्याचा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे.
----------------------------------------
निर्णयाचे धोके
- अधिकृत परवानगी ४७ स्टॉलला, मात्र प्रत्यक्षात ३०० हून अधिक स्टॉल
- रस्त्यांवर अतिक्रमण
- वाहतूक कोंडीची समस्या
- परप्रांतीय फेरीवाल्यांचा वावर
- चोरीच्या घटनांमध्ये वाढ
- हप्ते वसुलीला प्रोत्साहन
--------------------------------
स्थानिक दुकानदारांचे नुकसान
पनवेल परिसरातील आठवडा बाजारांचा सर्वाधिक फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवशी बाजार भरत असल्याने स्थानिक रहिवाशांचा अशा ठिकाणी वस्तू खरेदीचा कल वाढला आहे, पण यामुळे महिन्याला हजारोंचे भाडे भरणारे व्यापारी, दुकानदार त्रस्त झाले आहेत. व्यवसाय होत नसल्याने आर्थिक नुकसानीचा भार वाढला आहे.
--------------------------------
सफाई कर्मचाऱ्यांवर भार
रोडपाली येथे सोमवारी आठवडा बाजार भरवण्यात येतो. बसस्थानकाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात विक्रेते येतात. रात्री पुन्हा मुंबईकडे रवाना होतात. येथे प्लॅस्टिकच्या पिशव्या, आवरणे टाकून दिले जात आहेत. त्याचबरोबर भाजीपाला. इतर कचरासुद्धा तसाच पडून राहतो. हा कचरा गोळा करण्यासाठी सकाळी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना घाम गाळावा लागतो. त्यामुळे शहरातील अन्य भागांकडे दुर्लक्ष होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

