एनएमएमटी प्रवासात मनस्ताप

एनएमएमटी प्रवासात मनस्ताप

Published on

एनएमएमटी प्रवासात मनस्ताप
बस ट्रॅकर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाअंतर्गत बस ट्रॅकर ॲपची सेवा तांत्रिक कारणांमुळे पाच दिवसांपासून बंद पडली आहे. या ॲपचे सॉफ्टवेअर सांभाळणाऱ्या कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्याने सेवा रडतखडत सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणी उद्भवत आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या उपक्रमाच्या आयटीएमएस सेवे अंतर्गत हा ॲप कार्यरत असून, ही सेवा अद्ययावत करण्याकरिता केंद्र शासनाकडून एनएमएमटी प्रशासनाला कोट्यवधींचा विशेष निधी दिला आहे; परंतु अनेक महिन्यांपासून निविदेसंदर्भात केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे लालफितीच्या संथ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे.
-------------------------------
सेवा बेभरवशाची
काही वर्षांपूर्वी गाजावाजा करत एनएमएमटीचा बस ट्रॅकर ॲप तांत्रिक कारणामुळे बंद पडला आहे. जीपीएस लोकेशननुसार बस वेळेवर येत नसल्याने ताटकळत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येते. तसेच अनेक मार्गावरील बस ॲपमध्ये दिसतात. नंतर थोड्या वेळाने पुन्हा पाहिले असता गायब होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे ही सेवा बेभरवशाची झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
--------------------------
तांत्रिक अडथळे
पाच दिवसांपासून ॲप बंद असल्यामुळे प्रवाशांना बस किती वाजता येते. त्याचप्रमाणे बस कुठे आहे, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर जाऊन ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. काही तांत्रिक कारणास्तव सेवा विस्कळित झाली असून, लवकरच पूर्ववत होईल, असे एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com