भिवंडीत विषारी धुराचा त्रास

भिवंडीत विषारी धुराचा त्रास

Published on

भिवंडीत विषारी धुराचा त्रास
प्लॅस्टिक मणी कारखान्यातील भंगार कचऱ्याला आग; मानसरोवर वस्तीतील नागरिकांना श्वसनाचा त्रास

भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : भिवंडी शहर यंत्रमाग व्यवसायासोबतच प्लॅस्टिक मणी बनवणाऱ्या मोठ्या कारखान्यांसाठी ओळखले जाते. शहरातील शांतीनगर, नवीबस्ती या भागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या अशाच एका प्लॅस्टिक मणी कारखान्याच्या भंगार कचऱ्याने पेट घेतल्यामुळे निर्माण झालेल्या विषारी धुरामुळे नजीकच्या नागरी वस्तीतील नागरिकांना गंभीर त्रास जाणवत आहे.

नवीबस्ती येथील गोविंद कंपाउंड भागात प्लॅस्टिक मणी कारखान्यातून निघणारा भंगार कचरा परिसरातील डोंगराजवळील मोकळ्या जागेत टाकला जातो. येथील कचऱ्याने मंगळवारी (ता. २) दुपारी १२ वाजताच्या सुमारास पेट घेतला. पाहता पाहता या आगीने मोठा आगडोंब उडाला आणि त्याचा उग्र व विषारी धूर आकाशात पसरला. या आगीची माहिती भिवंडी अग्निशमन दलाला न देण्यात आल्याने ही आग विझण्याची वाट येथील नागरी वस्तीतील लोकांना पाहावी लागली.

आरोग्यावर परिणाम
परिसराच्या अगदी जवळच मानसरोवर ही नागरी वस्ती आहे. या वस्तीतील इमारतींमध्ये धुराचे लोट शिरल्याने अनेकांना श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. स्थानिक रहिवासी सीमा माहेश्वरी यांनी तक्रार केली की, नवीबस्ती येथील निर्जनस्थळी अनेक वेळा प्लॅस्टिक मणी कारखान्यातील कचरा जाळला जातो, ज्यामुळे मानसरोवर येथील नागरिकांना वारंवार धुराचा त्रास होत असतो.

तक्रारींनंतरही दुर्लक्ष
अनेक तक्रारी भिवंडी पालिका पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार केल्या गेल्या आहेत, तरीही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘‘येथील प्लॅस्टिक मणी बनविणाऱ्या कारखान्यांवर पालिका पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की कधी कारवाई करणार,’’ असा संतप्त सवाल सीमा माहेश्वरी यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com