समाजमाध्यमांच्या अतिरेकाने घात
समाजमाध्यमांच्या अतिरेकाने घात
नवी मुंबई शहरात ११ महिन्यांत ३४९ मुली बेपत्ता
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ११ महिन्यांच्या कालावधीत ४९९ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता आहेत. त्यामध्ये प्रेमसंबंध, नातेसंबंधातील गैरसमजांबरोबर समाजमाध्यमांच्या आहारी गेल्याने पळून गेलेल्या मुलींचे प्रमाण तीन पट असल्याने अनेक कुटुंबे विस्कटली आहेत.
नवी मुंबई शहरात १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत ३४९ मुली बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. हा आकडा अतिशय गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यापैकी अनेक प्रकरणात समाजमाध्यमांवरील आकर्षण, नातेसंबंधातील गैरसमज, घरगुती तणाव अशी प्रमुख कारणे आहेत. पनवेल, रबाळे, कोपरखैराणे परिसरातील प्रकरणांमध्ये हीच कारणे प्रकर्षाने दिसून आली आहेत, तर काही प्रकरणात इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
------------------------
घर सोडण्याची कारणे
प्रेमसंबंधातून फूस लावणे - १२८
अभ्यासाचा दबाव, कौटुंबिक वाद - ११४
मोबाईल नंबर, समाजमाध्यमांवर फूस - १०३
मित्राचा प्रभाव - ६३
मस्तीखोर, साहसी वृत्ती - ४८
नोंदवलेले एकूण गुन्हे - ४५८
-----------------------------------------
तुर्भे, रबाळेत सर्वाधिक गुन्हे
तुर्भे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ५१ मुले-मुली बेपत्ता आहेत. त्याखालोखाल रबाळे ४९, रबाळे एमआयडीसी ४१, पनवेल शहर ३९, खारघर ३३, कोपरखैरणे ३२, तळोजा ३१, एनआरआय ३० पोलिस ठाण्यांची आकडेवारी आहे. यातील अनेक पोलिस ठाण्यातील दाखल गुह्यांची उघडकीस येण्याची टक्केवारी समाधानकारक असली तरी, काही ठिकाणी तपासात उशीर होत झाल्याचे आढळून आले आहे.
------------------------
फूस लावण्याचे प्रकार
अल्पवयीन मुलींच्या दाखल ४९९ अपहरण प्रकरणापैकी २५ प्रकरणांमध्ये फूस लावून पळवून नेलेल्या मुलींवर लैंगिक अत्याचार आहेत. त्यामुळे २५ प्रकरणांचे पोक्सो कायद्यांतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहेत. तसेच फूस लावणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई केली आहे.
----------------------------
४५८ प्रकरणांची उकल
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने, विविध पोलिस ठाण्यांनी ४५८ अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लावला आहे. यात ३१५ मुली, १४३ मुलांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुले-मुली घरी परतले आहेत, मात्र ४१ प्रकरणातील अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता आहेत.
-----------------------------
अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणात प्रेमसंबंध, कौटुंबिक तणाव, मोबाईलच्या चुकीच्या वापर मुख्य कारण असल्याचे दिसत आहे. पालकांनी मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देणे, त्यांच्या मोबाईल, समाजमाध्यमांवर देखरेख ठेवणे गरजेचे आहे.
- पृथ्वीराज घोरपडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

