कल्याणचे ज्येष्ठ पॉवरलिफ्टर अशोक दीक्षित यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक
ज्येष्ठ पॉवरलिफ्टर अशोक दीक्षित यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक
श्रीलंकेत दोन सुवर्णपदकांनी भारताची मान उंचावली
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः वय हा केवळ आकडा आहे, हे परत एकदा ६४ वर्षीय कल्याणकरने सिद्ध केले आहे. कल्याण शहरातील ज्येष्ठ पॉवरलिफ्टर अशोक दीक्षित यांनी जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी हा बहुमान मिळवला.
अशोक दीक्षित यांनी डेडलिफ्ट प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर संपूर्ण पॉवरलिफ्टिंग गटामध्येही सर्वोत्कृष्ट कामगिरी करून आणखी एक सुवर्णपदक जिंकत भारताची शान वाढवली. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारे दीक्षित हे कल्याणच्या नमस्कार मंडळ येथे नियमित सराव करतात. प्रशिक्षक श्रीबास गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ते गेल्या अनेक वर्षांपासून कठोर परिश्रम घेत आहेत.
आतापर्यंत ११३ सुवर्ण
आजवर त्यांच्या नावावर २०२ स्पर्धांमध्ये तब्बल १६४ पदकांचा दणदणीत वैभवशाली ठसा आहे. ११३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २७ कांस्य अशी त्यांची कामगिरी तरुणांना प्रेरणा देणारी आहे. अशोक दीक्षित यांच्या या उल्लेखनीय यशाने कल्याण शहरासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

