पान ३ पट्टा
बस ट्रॅकर पुन्हा कार्यान्वित
नेरूळ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या आयटीएमएस सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक बिघाडामुळे एनएमएमटीची बस ट्रॅकर ॲप बंद होते. आयटीएमएस विभागाने ही तांत्रिक अडचण तातडीने दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे एनएमएमटी बस ट्रॅकर ॲप प्रणाली सुरळीत सुरू झालेली आहे. या ॲपद्वारे बसगाड्यांविषयी माहिती ट्रॅक करता येणार आहे. तसेच बसेसच्या लोकेशन्सची माहिती पूर्ववत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे ॲपव्दारे मिळणाऱ्या इतरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे दरम्यानच्या काळात प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.
़़़ः--------------------------------
गतिरोधकांमुळे अपघातांचे सत्र
नेरूळ (बातमीदार)ः कुकशेत गावातील प्रवेशद्वारालगतच बांधलेल्या गतिरोधकामुळे नेरूळ सेक्टर सहामधील एका महिलेचा अपघात झाला होता. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची लेखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिका प्रशासनाकडून चार-पाच दिवसांपूर्वीच नेरूळ पश्चिमेला गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यात कुकशेत गावामध्ये प्रवेश करताना वेशीलगत वळसा मारण्यापूर्वी सभागृहासमोरील रस्त्यावरही गतिरोधक बसविला आहे. या गतिरोधकाची नियमांप्रमाणे उंची नसल्यामुळे अपघात होण्याची भीती माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती.
़़़ः-------------------------------------
दिवा गावाचा पाणीप्रश्न मिटला
तुर्भे (बातमीदार) : शहरासह गाव-गावठाणामधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या अंतर्गत दिवा गावात नव्या जलवाहिनींसह विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. या भागामध्ये योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होणार असून, अनेक भागामध्ये कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या, गळती होत असलेल्या जलवाहिन्यांमुळे, लोकसंख्येच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याने काही ठिकाणी अयोग्य नियोजन, व्यवस्थापनामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. पालिकेच्या माध्यमातून विकासकामांना सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी कौतुक केले. या वेळी नगरसेवक चेतन नाईक, प्रकाश नाईक, विजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

