खान्देशकन्येला काव्यमय अभिवादन
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : खान्देशकन्या, निसर्गकन्या आणि ग्रामीण मातृभाषेची अद्वितीय संवेदना जागवणाऱ्या प्रतिभावान लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उल्हासनगरमध्ये काव्य, संस्कार आणि स्नेहाने भरलेला स्मरणसोहळा घेण्यात आला. श्रीरामनगरमधील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी चौकात साहित्यप्रेमी, समाजप्रेमी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र येत बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला आणि साहित्यभांडाराला काव्यमय अभिवादन अर्पण करण्यात आले.
निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी चौकात पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाईंना काव्यमय श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण साहित्याची शालीनता आणि मातृभाषेची सरळसोट शैली सहजपणे कवितेत उतरवणाऱ्या बहिणाबाईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे अध्यक्ष वसंत नेहेते, उपाध्यक्ष भास्कर पाटील, युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत उल्हासनगर शहराध्यक्ष दीपक नेमाडे, कोषाध्यक्ष अक्षय राणे, सदस्य विकास कोल्हे, कुंदन भंगाळे, उल्हासनगर युवा प्रबोधिनीचे अध्यक्ष निखिल पाटील आणि प्रथमेश राणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत उल्हासनगर शहर, उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघ, उल्हासनगर युवा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद कोलते यांनी केले. त्यांनी बहिणाबाईंच्या साहित्य वैभवावर मनोगत व्यक्त करत त्यांच्या कवितांचे रसाळ सादरीकरण केले. त्यानंतर प्रा. प्रकाश माळी यांनीही काव्यपंक्ती सादर करत बहिणाबाईंच्या स्मृतींना साजेशी काव्यांजली वाहिली. वातावरणात भाव, साहित्य आणि निसर्गचित्रांची अनोखी अनुभूती निर्माण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

