दिव्यांगांचा प्रवास होणार अधिक सुलभ

दिव्यांगांचा प्रवास होणार अधिक सुलभ

Published on

उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी उल्हासनगर महापालिकेकडून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या पुढाकाराने बस प्रवासात सवलत मिळवण्यासाठी ओळखपत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता दिव्यांग नागरिकांना दैनंदिन प्रवासात सुलभता, आत्मनिर्भरता आणि सामाजिक सहभागासाठी नवी दिशा मिळणार आहे.

आयुक्त आव्हाळे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आल्यानंतर सभागृहात उत्साह आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाच्या वतीने उपक्रमाची सोमवारी (ता. ३) अंमलबजावणी करण्यात आली. उल्हासनगर-३ येथील मुख्य प्रशासकीय इमारत, पहिला मजला, सभागृह येथे झालेल्या या उपक्रमात नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना बस सेवेत सवलत मिळवण्यासाठी विशेष ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमासाठी वारंवार लढा दिला होता. कार्यक्रमाला दिव्यांग संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांनी विविध दिव्यांग कल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच बस सेवेतील सवलत हा उपक्रम दिव्यांगांच्या स्वतंत्र आणि सुरक्षित प्रवासासाठी महापालिकेचा सकारात्मक प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या अडचणी ऐकून आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा निर्धारही पुनरुच्चारित करण्यात आला.

दिव्यांग बांधव हे शहराच्या प्रगतीचा अविभाज्य घटक आहेत. त्यांना दैनंदिन प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून बस सेवेत सवलत देण्यात येत आहे. महापालिका प्रशासन दिव्यांगांच्या गरजा, सन्मान आणि स्वावलंबनाला सर्वात प्राधान्य देते. पुढील काळातही अधिकाधिक सुविधा, प्रशिक्षण आणि सामाजिक सहभाग वाढवणाऱ्या योजना राबविण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील. दिव्यांग बांधवांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने या योजनांचा लाभ घ्यावा, हीच लोकाभिमुख प्रशासनाची भावना आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com