आज एकादिवसीय बाजार बंद ची हाक

आज एकादिवसीय बाजार बंद ची हाक

Published on

आज एकदिवसीय बाजार बंदची हाक
कालबाह्य तरतुदी रद्द करण्याची व्यापारी संघटनांची मागणी
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : कृषी उत्पन्न खरेदी-विक्रीमधील कालबाह्य तरतुदी रद्द करून नवा आणि व्यवहार्य कायदा लागू करावा, या मागणीसाठी राज्यातील व्यापारी संघटनांनी शुक्रवारी (ता. ५) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा बंद राहणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र चेंबर, कॅमिट, एफएएम, जीआरओएमए, पूना मर्चंट्स चेंबर यांसारख्या राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांनी या बंदला आपला पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही व्यापारी मोहन गुरनानी आणि सर्व सहभागी संघटनांकडून करण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साठ वर्षांपूर्वी बनवलेला कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम आजच्या बाजारपेठेच्या परिस्थितीला सुसंगत नाही. एफएसएसएआय, लीगल मेट्रोलॉजी, जीएसटी असे अनेक कायदे लागू झाल्याने व्यापार पद्धती, पॅकिंग, मोजमाप, प्रक्रिया मालाची हालचाल आणि ग्राहक सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. परंतु कृषी कायद्यात त्यानुसार सुधारणा न झाल्याने व्यापाऱ्यांवर अन्यायकारक बंधने येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. कृषी कायदा हा केवळ सेस वसूल करणारे साधन बनला आहे. त्याचा मूळ हेतू नाहीसा झाला आहे. त्यामुळे आमूलाग्र बदल अत्यावश्यक आहेत, असे पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष रायकुमार नहार आणि समन्वयक राजेंद्र बांठिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com