रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण या मोठ्या समस्या
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण या मोठ्या समस्या
भाजपचे सर्वेक्षण; मुंबईकर असमाधानी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः रस्ते, पाणी, आरोग्य, गृहनिर्माण व पुनर्वसन आणि शिक्षण या सर्वांत मोठ्या समस्या असून, त्याबाबत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगत मुंबईकरांनी असमाधान व्यक्त केले आहे. स्वच्छता आणि नालेसफाई व पूरनियंत्रणाबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाने सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे.
भाजपने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. मुंबईकरांनी भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ या मोहिमेअंतर्गत अभिप्राय नोंदवत मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू आणि गृहनिर्माण अशा महायुती सरकारच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त केले. मुंबईतील विकास प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त करतानाच रस्ते, पाणी, आरोग्य, गृहनिर्माण व पुनर्वसन आणि शिक्षण या सर्वांत मोठ्या समस्या आहेत. तसेच कचरा, स्वच्छता आणि नालेसफाई या तीन गोष्टींबाबत मुंबईकरांनी असमाधान व्यक्त केले आहे. पालिकेमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार हवा, अशी मागणी या सर्वेक्षणात केली आहे. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू झालेल्या या मोहिमेला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. एकूण २,६५,७३८ लोकांनी आपली मते दिली, त्यापैकी १,४५,६१६ लोकांनी मुंबई घडवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारीही दर्शवली आहे.
...
महत्त्वाच्या सूचना
- नियोजित हॉकर झोन तयार करा
- इनोव्हेशन हब उभारा
- मुंबई पर्यावरण आराखडा राबवा
- पालिकेच्या रुग्णालयांमध्ये महिला आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड हवेत
- पुरातन किल्ल्यांचा, राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा डिजिटल अनुभव देण्यासाठी ऑगमेंटेड रिॲलिटी बूथ्स उभारा
...
निवडणुकांनंतरही आम्ही ही जनसंवाद प्रक्रिया सुरू ठेवू आणि नागरिकांबरोबर सातत्याने त्यांचे अभिप्राय जाणून घेण्याची प्रक्रिया राबवून शासन आणि महापालिका धोरण सुधारण्याचा प्रयत्न करू.
- अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

