परळ टर्मिनस आणि एलटीटीच्या विस्ताराला मंजुरी
परळ टर्मिनस, एलटीटीच्या विस्ताराला मंजुरी
आता मुंबईतून यूपी-बिहारकडे अधिक गाड्या धावणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबईतून उत्तरेकडील राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या वाढवण्याचा मोठा आराखडा तयार केला होता. या योजनेतील दोन महत्त्वाचे प्रस्ताव परळ रेल्वे टर्मिनस उभारणी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विस्तार प्रकल्प यांना प्रकल्प मूल्यांकन समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे मुंबईला पुढील काही वर्षांत अधिक लांब पल्ल्याच्या गाड्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता रेल्वे बोर्डाकडून अंतिम परवानगी मिळण्याची प्रक्रिया उरली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर काही महिन्यांत टेंडर प्रक्रिया सुरू होईल. अधिकाऱ्यांचा अंदाज आहे, की डिसेंबरअखेर रेल्वे बोर्डाची परवानगी मिळेल आणि कामाचा वेग वाढेल. एलटीटी ते विद्याविहारदरम्यान रेल्वेकडे प्रशस्त जागा असल्याने येथे तीन ते चार नवीन फलाट उभारण्याची योजना आधीपासूनच होती. सध्या एलटीटीवरून २६ जोड्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या धावतात, तर सुट्टीच्या काळात हा आकडा ३७पर्यंत वाढतो. नवीन प्लॅटफॉर्म तयार झाल्यावर आणखी सहा ते १० गाड्या वाढू शकतील. दररोज जवळपास ७० हजार प्रवासी वापरत असलेल्या या टर्मिनसवरील ताण कमी होणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे मंत्रालयाने मुंबईतून ५० नवीन लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रस्तावित प्लॅटफॉर्मच्या जागेवर सध्या काही रेल्वे क्वार्टर्स, जुन्या लाइन आणि मालमत्ता आहेत. त्या जागेचे पुनर्विनियोजन करून विस्तारकाम राबवले जाणार आहे.
परळ टर्मिनसला हिरवा कंदील
परळ टर्मिनसही आता अधिकृत पुढे जाणार आहे. हा टर्मिनस कुर्ला ते परळ पाचव्या-सहाव्या मार्गिकेशी जोडला जाणार आहे. ही मार्गिका प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरली जाईल, त्यामुळे परळ टर्मिनस भविष्यात एक महत्त्वाचे मेल एक्स्प्रेस टर्मिनसचे केंद्र बनेल. या प्रकल्पावर सुमारे ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परळ वर्कशॉप परिसरातील काही झाडांची तोड टाळता येते का, यावरही रेल्वे विभाग विचार करीत आहे.
परळ टर्मिनसच्या प्रस्तावित सुविधा
- दोन आयलंड प्लॅटफॉर्म
- चार प्लॅटफॉर्म लाइन (२६ कोच क्षमतेच्या)
- दोन ६२० मीटर लांबीच्या स्टेबलिंग लाइन
- प्लॅटफॉर्म डेक आणि वाहन हालचालीसाठी अतिरिक्त जागा
- प्रवासी सुविधा, पार्किंग आणि प्रवेशद्वार व्यवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

