केडीएमसीच्या विविध विकासकामांचे उदया मान्यवरांचे हस्ते भूमिपुजन व लोकार्पण.....

केडीएमसीच्या विविध विकासकामांचे उदया मान्यवरांचे हस्ते भूमिपुजन व लोकार्पण.....

Published on

विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

कल्याण, ता. ५ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन आणि डोंबिवली (पूर्व) भूखंड क्र. ४९ या सुविधा भूखंडावर प्रेरणा वॉर मेमोरिअल या कामाचे लोकार्पण होणार आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या मुख्य सभागृहाच्या छताचा काही भाग कोसळल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून २४ मे २०२५ पासून हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. त्याचे संरचनात्मक ऑडिट करून घेतले असता संपूर्ण इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती व नूतनीकरणाची आवश्यकता होती. त्यामुळे या कामासाठी राज्य शासन स्तरावरून पहिल्या टप्प्यात १५ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सहा महिन्यांचा कालावधी
यामध्ये संपूर्ण सभागृहाचे आंतरिक विद्युतीकरण, ऑडिटोरिअम, साउंड सिस्टीम, फायर अलार्म सिस्टीमसह फायर पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, तसेच मुख्य छताचे नूतनीकरण ॲकॉस्टीक पॅनेलिंग, फॉलसिलिंग, ग्रीन रूम, व्हीआयपी रूमचे नूतनीकरण, प्रेक्षागृहातील खुर्च्या, कारपेट बसविणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे. हे काम सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, या प्रकल्पासाठी शासन स्तरावर निधी व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती
प्रेरणा वॉर मेमोरिअल हे स्मारक महापालिका आणि पद्मश्री गजानन माने यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला प्रकल्प आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, वास्तुशिल्पीय दृष्टिकोन आणि पर्यावरणस्नेही दृष्टी ठेवून प्रत्येक घटकाची काळजीपूर्वक उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये तिन्ही सैन्यादलाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये १९९३ मध्ये भारतीय नौदलात दाखल झालेल्या युद्धनौका INS विनाशची प्रतिकृती, जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक अशा ब्राम्होस या क्षेपणास्त्राची प्रतिकृती, १९९९ च्या युद्धात वापरण्यात आलेले, भारताने विकसित केलेले चपळ, अत्याधुनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान (जेट फायटर) तेजसची प्रतिकृती, १९ व्या शतकात युद्धात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या तोफेची प्रतिकृती त्याप्रमाणे भुदल, नौदल, वायुदलातील स्त्री व पुरुष सैनिकांच्या प्रतिकृती या मेमोरिअलमध्ये साकारण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील हे पहिले वॉर मेमोरिअल डोंबिवली येथे उभारण्यात आले आहे. प्रेरणा या नावाला साजेशी, शौर्य आणि त्यागाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवणारे विचार प्रवर्तक आणि भावनिक अनुभूती देणारे असे हे स्मारक आहे. देशातील तरुणांना, सैनिक होण्यासाठी प्रेरणा देणारे आणि नागरिकांना आपल्या देशाप्रती योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणारे हे स्मारक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com