अंबरनाथकरांना मिळणार वाढीव पाणी

अंबरनाथकरांना मिळणार वाढीव पाणी

Published on

अंबरनाथकरांना मिळणार वाढीव पाणी
२० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे ९५ टक्के काम पूर्ण

अंबरनाथ, ता. ६ : अंबरनाथ पश्चिमेतील नवीन वडवली गावातील सर्वोदयनगर परिसरातील नागरिकांना अखेर वाढीव पाणीपुरवठ्याचा दिलासा मिळणार आहे. नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या वाढीव जलकुंभाचे तब्बल ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे मागील पाच वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या २५ ते ३० हजार नागरिकांना आता नियमित आणि पुरेसा पाण्याचा लाभ मिळणार आहे. नववर्षात ही मोठी भेट ठरणार असल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक पदाचे उमेदवार शैलेश भोईर यांनी दिली.

गुरुवारी मजीप्रा अधिकारी आणि जलव्यवस्थापन विभागाने या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. पूर्ण झालेले काम : जलकुंभाचे कलरिंग, पाइप जोडणी, पंप व ट्रान्स्फॉर्मर बसवण्याची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. पाण्याची चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. शिल्लक काम : सध्या फक्त मुख्य जलवाहिनी (सुमारे ३५० मि.मी.) शिफ्ट करण्याचे काम शिल्लक असून, ते पूर्ण होण्यासाठी अंदाजे एक ते दीड महिना लागणार आहे.

शिवसेना आश्वासन देत नाही, तर काम पूर्ण करण्याची हमी देते. महिनाभरापूर्वी नागरिकांना दाखवलेली ही टाकी आज ९५ टक्के तयार आहे. पुढील दीड महिन्यात पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होईल. या टाकीतून एकाच वेळी दोन स्वतंत्र वाहिन्या कार्यरत होणार असल्याने परिसरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या भागांना मिळणार पाणी
नवीन जलकुंभातून पुढील भागांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू होणार आहे. सर्वोदयनगर स्क्वेअर, सृष्टी हिल, सत्यम हॉल परिसर, मेट्रो सिल्व्हर, चिखलोली-सर्वोदयनगर चौक, हरीश्री, करण गार्डन
कस्तुरी, थारवानी-२ या भागांना पाणी मिळणार आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त असलेल्या चिखलोली परिसराला मोठा दिलासा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com