आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वाचन उपयोगीच पडते - मंदार धर्माधिकारी

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वाचन उपयोगीच पडते - मंदार धर्माधिकारी

Published on

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वाचन उपयोगीच पडते
मंदार धर्माधिकारी यांचे प्रतिपादन ः अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचे उद्‍घाटन
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : शालेय व महाविद्यालयीन जीवनात वाचलेली पुस्तके आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगी पडतात. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात निर्णय घेताना पुस्तकातील संचित ज्ञान आपल्याला सुयोग्य निर्णय घेताना मदतकारी ठरते. त्यामुळे तुम्ही मुलांनी भरपूर वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी सहायक पोलिस आयुक्त आणि लेखक मंदार धर्माधिकारी यांनी केले. अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सलग ३६ तास व एकत्रित ३०० अखंड वाचन यज्ञ उपक्रमाचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी पुस्तक आदान-प्रदान चळवळीचे संकल्पनाकार पुंडलिक पै यांनी मुलांनी कोणती पुस्तके वाचावी याविषयी मार्गदर्शन केले. तर माजी आमदार प्रकाश भोईर यांनी वाचनातून आपण कसे घडलो आणि आजही आपले वाचन कसे सुरू असते हे विविध प्रसंगातून उलगडून दाखविले. ॲड. विवेक बिवलकर यांनी वाचनाचे बदलते स्वरूप याविषयी माहिती दिली. अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचे संकल्पनाकार योगेश जोशी या उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली आणि हा उपक्रम कसा साकारत गेला हे मांडले.

अडीच हजारांहून अधिक वाचक सहभागी
या समारंभानंतर बालक मंदिर संस्था येथील वि. आ. बुवा वाचन नगरी, भारताचार्य चिंतामणराव वैद्य सभागृह, डॉ जयंत नारळीकर वाचन कट्टा, योगानंद क्लासेस येथील बाळ कोल्हटकर वाचन कट्टा येथे एकूण २५ शाळांमधून विविध विषयांवरचे वाचन सुरू झाले. गेल्यावर्षी या उपक्रमात एक हजार ६७८ वाचक सहभागी झाले होते. तर यावर्षी दोन हजार ५०० हून अधिक वाचक सहभागी होणार असल्याचे सचिव हेमंत नेहते यांनी सांगितले. या उपक्रमात चित्रकार प्रदीप जोशी यांनी रेखाटलेल्या साहित्यिकांच्या रेखाचित्रांचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com