प्रारूप मतदार याद्यांवर तक्रारींचा भडिमार ....
प्रारूप मतदार याद्यांवर तक्रारींचा भडिमार
पालिकेच्या ३१ प्रभागातून मतदार याद्याबाबत आठ हजार ४०० हरकती
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती. या मुदतीच्या अंतिम दिनी पालिकेच्या ३१ पॅनलमधून तब्बल आठ हजार ४०० नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. तर, मतदारांची अंतिम यादी बुधवारी (ता. १०) प्रसिद्ध केली जाणार आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेची निवडणुका यंदा प्रथमच पॅनल पद्धतीने घेतली जाणार आहे. १२२ सदस्य निवडीकरीता चार सदस्यांचे २९ पॅनल व तीन सदस्यांचे दोन पॅनल असे ३१ पॅनल आहेत. या पॅनलसाठी अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी पालिकेतील मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. पालिकेच्या ३१ पॅनलमध्ये एकूण १४ लाख २४ हजार ५४० मतदारांचा समावेश होता. या मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती. त्यानंतर बुधवार (ता. ३)पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीच्या अंतिम दिनी १२२ प्रभागातून आठ हजार ४०० जणांनी हरकती नोंदविल्या आहेत. पॅनल क्रमांक एकमधून ९३४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. तर, पॅनल क्रमांक २० मधून १७ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
ठाण्यातील मतदारांची नावे कल्याण ग्रामीणमध्ये
प्राप्त हरकतीमध्ये एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रभागाच्या सीमेरेषेवरील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात जाऊ शकतात. मात्र, प्रभागाच्या मध्य भागातील मतदारांची नावे एकगठ्ठा दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. तर, ठाण्यातील मतदारांची नावे कल्याण ग्रामीणमधील काटई गावात दाखविण्यात आली आहे. ज्या मतदारांचे नाव व पत्ते काटई गावात दाखवले गेले आहेत. त्याठिकाणी त्या नाव व पत्त्याच्या चाळीच अस्तित्वात नाहीत.
अशी असेल प्रक्रिया
मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकतींचे निवारण करण्याच्या सूचना आयोगाने पालिकेच्या निवडणूक विभागाला दिल्या आहेत. यानुसार हरकतीची छाननी मंगळवार (ता. ९)पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी बुधवारी (ता. १०) प्रसिद्ध केली जाणार आहे. तर, मतदान केंद्रांची यादी १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्रनिहाय यादी २२ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीसाठी आचार संहिता लागून तारीख घोषित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे
तब्बल ८२ हजार ५५८ मतदारांची नावे दुबार
दुसरीकडे प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल ८२ हजार ५५८ मतदारांची नावे दुबार असल्याची बाब समोर आली आहे. मनसने दुबार मतदारांची नावे ३२ हजार असल्यासंदर्भात दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात आढळून आलेल्या दुबार मतदारांची नावे ही दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. ही नावे वगळण्याची मागणी मनसेने प्रांताधिकांऱ्याकडे केली आहे. या प्रारूप मतदार यादीत ८२ हजार ५५८ दुबार नावे असल्याने पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

