मुलांचे भवितव्य बदलायचे असेल तर, भूल्थापणा बळी पडू नका

मुलांचे भवितव्य बदलायचे असेल तर, भूल्थापणा बळी पडू नका

Published on

भूलथापांना बळी पडू नका!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणेकरांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : क्लस्टर योजना म्हणजे समूह पुनर्विकास योजना होय. या योजनेंतर्गत तुम्हाला तुमच्या जागेतच घर मिळणार आहे. मोठे रस्ते, मैदान, हॉस्पिटल आणि शाळा उपलब्ध होणार आहे. तुमच्या मुलांचे भवितव्य बदलणार आहे. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच या योजनेंतर्गत १०० टक्के लोकांना घरे मिळणार असल्याचे सांगत, मानपाडा भागात क्लस्टर योजना राबविण्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी या वेळी केला.
ठाण्यातील विविध विभागांत भूमिपूजन, लोकापर्णाचे कार्यक्रम शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी मनोरमानगर येथील जलकुंभाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ठाणे बदलत आहे, ठाणे पुढे जात आहे. प्रत्येकाच्या घराजवळ मेट्रो उपलब्ध होणार आहे. घोडबंदरची वाहतूक कोंडी येत्या काळात सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. घोडबंदरच्या बाहेरून वाहतूक जाण्यासाठी फ्रीवेचे कामही सुरू झाले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
---
प्रत्येकाला हक्काचे घर मिळणार
गेल्या अडीच, तीन वर्षांत अनेक विकासकामे झाली आहेत. नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात आता ठाणेकरांना मुंबईला जोडण्यासाठी ठाणे-बोरिवली टनेलचे कामही सुरू झाले असून २० मिनिटांत ठाणेकरांना बोरिवली जाता येणार आहे. ठाण्यात प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी क्लस्टरच्या माध्यमातून समूह विकास हाती घेण्यात आला आहे. घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगले, हक्काचे असावे. सोयी सुविधांसह घर मिळायला पाहिजे. त्यासाठी मागील १५ वर्षे आम्ही क्लस्टरसाठी पाठपुरावा केला. अनेक वेळा त्यासाठी संघर्ष केला; मात्र क्लस्टरचा पिच्छा सोडला नाही. एसआरएमध्ये योजनेत खालच्या लोकांना घरे मिळतात; परंतु क्लस्टरमध्ये वरच्यांनादेखील घर मिळणार आहे. एकही जण घरापासून वंचित राहणार नाही, असा आमचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
......................
कोंडीमुक्त प्रवास
मागील काही वर्षात ठाण्यात अनेक विकासकामे झाली आहेत. मुख्य मेट्रो सुरू होत आहे. त्याला रिंग मेट्रो जोडली जाणार आहे. घोडबंदर रोड वाहतूक कोंडीमुक्त होणार असून त्यासाठी फ्री वेचेही काम सुरू झाले आहे. लवकरच ठाणेकर कोंडीमुक्त प्रवास करू शकतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com