डोंबिवलीत एकविसावा आगरी महोत्सव १
डोंबिवलीत रंगणार आगरी महोत्सव
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : आगरी युथ फोरम सेवाभावी संस्थेचा आगरी महोत्सव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिमाखात साजरा होणार आहे. हा महोत्सव सावळाराम क्रीडा संकुलात १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाब वझे व नवनिर्वाचित अध्यक्ष शरद पाटील यांनी दिली.
आगरी महोत्सवाचे उद्घाटन क्रिकेट संघातील माजी कसोटी क्रिकेटपट्टू नीलेश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह ज्येष्ठ नेते राम ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे, संजय पाटील, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, विजय पाटील, नारायण महाये, कांता पाटील, अनंत पाटील, दीपक पवार, वासुदेव पाटील यांच्यासह कार्यकर्ते तयारी मेहनत घेत आहेत.
आगरी पदार्थांची मेजवानी
या महोत्सवात आगरी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांसह आगरी खाद्यपदार्थांची मेजवानी असते. समाजप्रबोधनपर चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन केले जाते, अशी माहिती महाेत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे. यंदा महोत्सवाचे अध्यक्षपद शरद पाटील भूषविणार आहेत. या महोत्सवात दि. बा. पाटील एक व्यक्तिमत्त्व या परिसंवादात दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील सहभागी हाेणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

