पालिका निवडणुकीसाठी 
पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

Published on

पालिका निवडणुकीसाठी
पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

टिळक भवनात काॅँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणूक कानमंत्र दिला. निवडणुकीसाठी अर्ज कसा करावा, बूथची बांधणी कशी करावी, आपले मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे कसे मांडावेत, पालिका प्रशासन कसे काम करते, सामाजिक कामासाठी आरटीआयचा कसा उपयोग करावा, अशा विविध विषयांवार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या पुढाकाराने दादर येथील टिळक भवनमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिका आणि आरटीआयसंदर्भात सविस्तर माहिती देतानाच ‘माहिती कशी मिळवायची आणि जनहितासाठी तिचा प्रभावी वापर कसा करायचा’ याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, सचिव प्रभारी पवन मजेठिया, सचिव हरगुन सिंह प्रमुख उपस्थित होते.

‘बूथ मजबूत करा, मग बाकीचे सर्व होऊ शकते,’ असा ठाम संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया, आवश्यक अटी आणि काळजीपूर्वक पाळावयाच्या बाबींची माहिती दिली. माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी महापालिकेची रचना, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि कामकाजाची पद्धत यावर विस्तृत प्रकाश टाकला. भारतीय युवक काँग्रेसचे सोशल मीडिया चेअरमन मनू जैन यांनी महापालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिले. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रचार, संवाद आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या विविध रणनीतीबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com