देशातील पहिला आयकॉनिक इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना

देशातील पहिला आयकॉनिक इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना

Published on

करमणूक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल
देशातील पहिला आयकॉनिक इनडोअर लाइव्ह एन्टरटेन्मेन्ट अरेना नवी मुंबईत उभारणार
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) ः भारतातील करमणूक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत सिडकोने देशातील पहिल्या आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाइव्ह एन्टरटेन्मेन्ट अरेनाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. २०,००० आसन क्षमता आणि २५,००० उभ्या प्रेक्षकांची व्यवस्था असलेल्या या जागतिक दर्जाच्या अरेनामुळे नवी मुंबई ‘लाइव्ह एन्टरटेन्मेन्ट रेव्होल्यूशन’चे केंद्रस्थान ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सिडकोतर्फे ‘स्वारस्य अभिव्यक्ती’ (EOI) जारी करण्यात आली आहे. ९ डिसेंबरपासून दस्तऐवज ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.

मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि ओटू अरेनाची प्रेरणा
न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनच्या ओटू अरेनाच्या धर्तीवर विकसित होणारा हा प्रकल्प देशातील करमणूक पायाभूत सुविधांसाठी नवा मानदंड ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय संगीत मैफली, क्रीडा स्पर्धा, भव्य सांस्कृतिक उत्सव आणि आभासी अनुभव यांसाठी हा अरेना केंद्रबिंदू राहील.

रोजगार, पर्यटन आणि नव्या उद्योगांना चालना
या अरेनाच्या उभारणीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटन आणि ऑडिओ-व्हिज्युअल उद्योगांना नवसंजीवनी मिळणार आहे.

करमणुकीची राजधानी
सिडको उद्योगातील शीर्ष भागीदारांसोबत काम करून जागतिक तंत्रज्ञान आणि परिचालन ज्ञान भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याने ‘भारताची थेट करमणुकीची राजधानी’ म्हणून नवी मुंबईला मिळणारे नवे स्थान अधिकच बळकट होत असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

अभिमानाचा विषय
नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र म्हणून विकसित करणे हा सिडकोचा अभिमानाचा विषय आहे. हा अरेना म्हणजे सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीची सुरुवात असून कलाकार, उद्योजक आणि स्थानिक उद्योगांसमोर मोठ्या संधींचे दरवाजे उघडणार आहेत, असे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.

नवी मुंबई तयार ‘ग्लोबल इव्हेंट सिटी’ होण्यासाठी
नवी मुंबईतील पायाभूत सुविधांचा झपाट्याने होणारा विकास या प्रकल्पाला पूरक ठरणार आहे
• अटल सेतू, हाय स्पीड रेल्वे व नवी मुंबई मेट्रोमुळे अखंड कनेक्टिव्हिटी
• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जागतिक कलाकार व लॉजिस्टिक्सला वेग
• नेरूळ जेट्टीमार्फत पर्यटन व फिल्म उत्पादनाला चालना
• खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, १८-होल्स गोल्फ कोर्समुळे क्रीडा क्षेत्र बळकट
• आगामी एरो सिटी, मेडि सिटी आणि एज्यु सिटी प्रकल्पांमुळे एकात्मिक विकास संकल्पना अधिक मजबूत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com