डोंबिवलीत स्कूल आर थॉन मॅरेथॉनला
‘स्कूल आर थॉन’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवलीत दोन हजार १०० विद्यार्थ्यचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : डिसेंबरच्या पहिल्या रविवारची (ता. ७) ‘सकाळ’ डोंबिवलीतील दोन हजार १०० विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. डोंबिवली पूर्व येथील रुस्तमजी अर्बन वुडस् येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊन टाऊन आणि ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आयोजित ‘स्कूल आर थॉन’ मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा एकच किलबिलाट पाहण्यास मिळाला.
स्कूल आर थॉन या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना शारीरिक क्रियाशीलता, आरोग्यदायी स्पर्धा, सामाजिक उत्तरदायित्व आणि आत्मविकासासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. यावर्षीचा चिल्ड्रन रनिंग टू सेव्ह अ हार्ट म्हणजेच मुलं धावताहेत एका हृदयाला जीवनदान देण्यासाठी हा संदेश आहे. बालहृदयविकार हा लहान वयात आढळल्यास जीवघेणा ठरू शकतो, मात्र योग्यवेळी शस्त्रक्रिया झाल्यास मूल पुढील आयुष्य निरोगी जगू शकते. भारतात दरवर्षी दोन हजारांहून अधिक बालकांना अशा शस्त्रक्रियांची आवश्यकता भासते. यंदा टायटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष माकोल यांनी बालहृदय शस्त्रक्रिया हा आपला थ्रस्ट एरिया प्रोजेक्ट म्हणून घोषित केला आहे. जिल्ह्यातील अनेक क्लब अशा उपक्रमांद्वारे निधी संकलित करून या शस्त्रक्रियांसाठी मदत करत आहेत.
आरसीडीडीतर्फे स्कूल आर थॉनमधून संकलित झालेला निधी श्री सत्य साई हॉस्पिटल, बेलापूर येथे होणाऱ्या बालहृदय शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया गरीब आणि गरजू मुलांवर केल्या जाणार आहेत. हा उपक्रम मुलांच्या आरोग्यवर्धनाबरोबरच समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची संधीही त्यांना देतो.
चौकट
पाच, तीन आणि दोन किलोमीटरच्या तीन गटांत झालेल्या या स्पर्धेमध्ये डोंबिवली शहरातील १४० शाळांमधील दोन हजार १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत नऊ ते ११ वयोगटातील (मुले-मुली) एक हजार ७०० विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदे गट आमदार राजेश मोरे, भाजप आमदार सुलभा गायकवाड, टायटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष मकोल उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

