शाळा बंद आंदोलनाला संस्थाचालकांनीच लावला सुरूंग
शाळा बंद आंदोलनाला संस्थाचालकांचा सुरुंग
आंदोलन अपयशी झाल्याने शिक्षक संघटनांत संताप
मुंबई, ता. ७ ः शिक्षक, मुख्याध्याापक संघटनांच्या ५ डिसेंबर रोजीच्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला संस्थाचालकांनीच सुरुंग लावत ते अपयशी केल्याची बाब समोर आली. शिक्षकांना शाळा बंद आंदोलनात सहभाग घेता येणार नाही, यासाठीची सर्व खबरदारी संस्थाचालकांनी घेतल्याने मुंबईतील ८४८ पैकी केवळ सात शाळा बंद राहिल्या.
शालेय शिक्षण विभागाने मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये गैरहजर राहिलेल्या शिक्षकांची आणि बंद शाळांची माहिती जमवली. त्यानुसार मुंबईत केवळ सात शाळा बंद होत्या. १४ हजार ७९२ शिक्षकांपैकी केवळ ७५७ शिक्षकच आंदोलनात सहभागी झाले. उर्वरित शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्यास मुंबईतील अनेक संस्थाचालकांनी मज्जाव केला, तर काहींनी सामुदायिक रजा टाकली असता, त्यालाही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
शाळा बंद आंदोलन अपयशी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संस्थाचालकांच्या या कारनाम्याविरोधात शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवयुनिटी फाऊंडेशच्या प्रा. बालुशा माने यांनीही संस्थाचालकांविरोधात तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. संस्थाचालकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने त्यांचे अधिकार कमी करण्यासाठी शाळा संहितेत बदल करावे, अशी मागणी त्यांनी केली.
--
संस्थाचालकांचीही चौकशी करा
संस्थाचालकांनी आरक्षणाचे नियम धाब्यावर बसवून आपल्याच कुटुंबातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणात नियुक्त्या दिल्या. बोगस शालार्थ आयडीत याच मंडळींचा अधिक सहभाग आहे. सरकारी वेतन घेऊन ज्ञानदानाचे काम न करणाऱ्यांचीही संख्या अधिक असल्याने त्यांनी शाळांमध्ये, वर्गात शिक्षकांचे छायाचित्र, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याला विरोध केला होता. त्यामुळे या संस्थाचालकांची चौकशी करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

