थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक
थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक
- भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्थगिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांच्या झालेल्या पक्षप्रवेशाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. समाजमाध्यमांवर त्यांनी हा संदेश दिल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचा नारा देत पक्षाने मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून इनकमिंग सुरू केले आहे. महायुतीचा प्रमुख घटक असलेला शिवसेना शिंदे गटही याला अपवाद नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः यामध्ये लक्ष घातल असून, गेल्या महिन्याभरापासून त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे अनेक मोठे मासे गळाला लावले. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये टोकाचा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर काही काळ हे पक्षप्रवेशाचे सोहळे शांत होते, पण काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले सदानंद थरवळ यांचे पूत्र अभिजित थरवळ यांनी भाजपमध्ये थाटात प्रवेश घेतला, मात्र आता हा पक्षप्रवेश फसल्याची चर्चा आहे.
अधिकृत कारण नाही
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विकासकामांच्या लोकार्पणानिमित्त एका मंचावर होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शेरोशायरी करून चव्हाण यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, पण एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे आपली शिष्टाई दाखवली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणूनच थरवळ यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती मानली जात आहे, मात्र स्थगितीचे नेमके अधिकृत कारण देण्यात आलेले नाही.
कोणता झेंडा घेऊ हाती
रविवारी रवींद्र चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर अभिजित थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर डोंबिवलीत चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, थरवळ यांच्या जिजाईनगर परिसरातील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हा बॅनर लावून डिवचण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

