डोंबिवलीत मंगळवारी १५ तासांची पाणीकपात

डोंबिवलीत मंगळवारी १५ तासांची पाणीकपात

Published on

डोंबिवलीत मंगळवारी १५ तासांची पाणीकपात
देखभाल, दुरुस्तीसाठी महापालिकेचे ''शटडाऊन''
डोंबिवली, ता. ८: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महत्त्वाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मंगळवारी (ता. ९) डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

मोहिली उदंचन केंद्रातून नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात (१५० दशलक्ष लिटर क्षमता) पाणी शुद्ध केले जाते. येथील पाणी पुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचे काम, फिल्टरबेड आऊटलेट जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अमृत-२ योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन उंच जलकुंभाला मुख्य इनलेट जलवाहिनीशी जोडण्याचे महत्त्वाचे काम घेण्यात आले आहे. तसेच डोंबिवली विभागातील वितरण व्यवस्थेतील आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे घेण्यात आली आहेत. या सर्व कामांसाठी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राचा १५ तासांचा ''शटडाऊन'' घेण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com